Sunny Leone walked the ramp with autistic children! Happy to celebrate  SAKAL
मनोरंजन

Sunny Leone: सनी लिओनीने ऑटिस्टिक मुलांसोबत केला रॅम्प वॉक! साजरा केला आनंद

सनी लिओनीने सामाजिक भान जपल्याचं उदाहरण नुकतंच समोर आलंय

Devendra Jadhav

सनी लिओनी ही भारतीय मनोरंजन विश्वातील महत्वाची अभिनेत्री. सनीने आजवर अनेक सिनेमा, वेबसिरीज मधुन स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीय.

सनी लिओनी बॉलिवूडच्या चमचमत्या इंडस्ट्रीत जितकी सक्रीय आहे तितकीच ती सामाजिक भान जपणारी अभिनेत्री आहे. नुकतंच सनीने ऑटिस्टिक मुलांना मदत करण्यासाठी त्यांच्यासोबत रॅम्पवॉक केला.

(Sunny Leone walked the ramp with autistic children!)

सनी लिओनीने केरळ राज्यात ऑटिस्टिक मुलांना मदत करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला असून या कृत्याने केरळच्या लोकांच्या हृदयावर एक अनोखी छाप पाडली आहे.

सनी लिओनीच्या उपस्थितीने या खास कार्यक्रमात आशेचा किरण आणला. सनी लिओनीने या अत्यंत संवेदनशील उपक्रमात चार चॉंद लावुन कार्यक्रमाची शोभा वाढवली. याशिवाय सनीने काही ऑटीस्टीक मुलींच्या हातात हात घालून रॅम्पवॉक केले. यावेळी चालत असताना तिचे डोळे आनंदाने भरून आले.(Latest Marathi News)

ऑटिस्टिक मुलांचे जीवन सुधारण्यासाठी सनी लिओनीची अतूट बांधिलकी दिसली. कार्यक्रमाच्या प्रायोजकांनी सनीला या खास गोष्टीसाठी सपोर्ट केला. यावेळी सनीचे लहान मुलांवरील प्रेम दिसुन आले.

पिढ्यानपिढ्या टिकून राहणारं प्रेम आणि प्रेमाचा वारसा सोबतीला घेऊन ती या खास मुलांसाठी आशेचे प्रतीक बनली. सनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती तिच्या "केनेडी" चित्रपटाने जागतिक पातळीवर प्रेक्षकांचं प्रेम मिळवत आहे.

सोबतीला जॅकी श्रॉफ, प्रियामणी आणि सारा अर्जुन यांसारख्या प्रतिभावंतांसमवेत तिच्या "कोटेशन गँग" या तमिळ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून ज्याने मिलीयनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळविले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025 : भारताचा आज ओमानविरुद्ध अखेरचा साखळी सामना; संजू सॅमसन, जसप्रीत बुमराहला विश्रांती? कशी असेल प्लेईंग XI?

Morning Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्याला इडली-पोह्याचा कंटाळा आलाय? मग बनवा झटपट सुरतचा फेमस लोचो, लगेच नोट करा रेसिपी

Panchang 19 September 2025: आजच्या दिवशी देवी कवच स्तोत्र पठण व ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

आजचे राशिभविष्य - 19 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT