Sunny Leoni
Sunny Leoni  team esakal
मनोरंजन

Sunny Leone: पाहुणे होते तराट! सनीच्या लग्नाची अकरा वर्षांपूर्वीची गोष्ट

युगंधर ताजणे

Sunny Leone 11th marriage anniversary - बॉलीवूडमध्ये सनी लिओनीची एंट्री झाली तेव्हा अनेकांनी नाकं मुरडली होती. पॉर्न स्टार म्हणून जगप्रसिद्ध असलेली अभिनेत्री बॉलीवूडमध्ये नंबर एकची डान्स आयटम गर्ल झाली. तिच्या (Bollywood Actress) लोकप्रियतेत वाढ झाली. सोशल मीडियावर तिला फॉलो करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले. सनीला मोठमोठ्या निर्माते, दिग्दर्शकांकडून (Entertainment News) ऑफल आल्या. सध्या तिच्याकडे काही महत्वाच्या फिल्म्स आहेत. ते यावर्षी प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. सध्या सनी तिच्या एका (Sunny Leoni News) पोस्टमुळे चर्चेत आली आहे. बॉलीवूडमध्ये आलिया रणबीरच्या लग्नाचा फिव्हर सुरु असताना दुसरीकडे आपल्या लग्नाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

सनीचं लग्न डॅनियल वेबरशी झालं. या जोडप्याला तीन मुलं आहे. सनी नेहमीच तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. तिच्या पोस्टची चर्चा होत असते. कधी वेगळ्या स्टाईलमध्ये फोटोशुट, तर कधी गंमतीशीर व्हिडिओ पोस्ट करुन ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. आता तिनं लग्नाच्या वाढदिवसाची पोस्ट शेयर केली आहे. त्या पोस्टमध्ये सनी म्हणते, आमच्याकडेही लक्ष असु द्या, आमच्या लग्नाला अकरा वर्षे झाली. तिनं लग्नाचा एक जुना व्हिडिओ पोस्ट केला असून त्यामध्ये गुरुव्दारामध्ये पंजाबी रिती रिवाजानुसार तिचा विवाह पार पडल्याचे दिसत आहे. सनी पोस्टमध्ये म्हणते, लग्नासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. लग्नात जी आहेराची पाकिटं आली त्यातून लग्नाचा सगळा खर्च केल्याची आठवण सनीनं सांगितली आहे. लग्नाला केवळ 50 माणसचं आली होती.

लग्नाच्या रिसेप्शनचा खर्च द्यायला आमच्याकडे पैसे नव्हते. अशावेळी आम्हाला लग्नं कसं होणार हाच मोठा प्रश्न पडला होता. लग्नाचा हॉल ज्याप्रकारे डेकोरेट कराय़चा होता तो तसा झाला नाही. अनेकांनी दारु पिऊन वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट पास करण्यास सुरुवात केली होती. लग्न बाजुला राहिले आणि वेगळाच प्रकार तिकडे सुरु झाला होता. लग्नाची आठवण ही नेहमीच आमच्यासाठी प्रेरणादायी म्हणावी लागेल. आमच्यातील समजुतदारपणा आम्हाला नेहमीच उपयोदी पडला. त्याचा फायदाही अशावेळी झाला. असं सांगत सनीनं लग्नातील एक फोटोही शेयर केला आहे. चाहत्यांनी सनी आणि डॅनियला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT