amitabha and rajesh khanna story 
मनोरंजन

जया बच्चन फार चिडल्या होत्या, त्याला कारणच तसं होतं...

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  दोघांची मैत्री सगळया बॉलीवूडला माहिती होती. त्यांचं प्रेम, एकमेकांबद्दल आदर सर्वांसाठी आदर्श होता. त्यातील एकानं केव्हाच जगाचा निरोप घेतला. दुसरा बॉलीवूडचा महानायक आहे. त्यांना जग अमिताभ बच्चन या नावानं ओळखते. त्यांची आणि बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार असणारे राजेश खन्ना यांच्यातील मित्रत्व सगळ्यांना माहिती आहे. त्याविषयीच्या गप्पा अनेकांच्या आवडीचाही विषय असतो. राजेश खन्ना यांनी त्यांच्या करिअरमध्ये बॅक टू बॅक 15 सुपपहिट चित्रपट दिले होते. तो रेकॉर्ड अद्याप कुणी तोडलेला नाही. मात्र जेव्हा अमिताभ यांनी बॉलीवूडमध्ये इंट्री केली तेव्हा राजेश खन्ना यांच्या स्टारडमला धोका पोहचण्यास सुरुवात झाली होती.

काही जण असे म्हणत होते की जेव्हा बिग बी अमिताभ बच्चन यांची एंट्री झाली तेव्हापासून राजेश खन्ना हे यांची चिडचिड वाढायला लागली होती. एकदा तर त्यांनी अमिताभ यांचा अपमानही केला होता. राजेश खन्ना यांच्या आयुष्यातील ती सर्वात मोठी चूक होती असे त्यावेळी म्हटले गेले होते. अमिताभ जेव्हा बॉलीवूडमध्ये आले तेव्हा त्यांच्या जोडीला अनेक कलाकार होते. राजेश खन्ना त्यावेळी यशाच्या शिखरावर होते. त्यांचा अभिनय, एक्सप्रेशन्समुळे त्यांचे चित्रपट प्रचंड यशस्वी होताना दिसत होते. 
जेव्हा अमिताभ यांनी अँग्री यंग मॅनच्या भूमिकेत गेले तेव्हा मात्र राजेश खन्ना यांचा प्रभाव कमी व्हायला लागला होता. आणि ते प्रेक्षकांच्या पसंतीस पडू लागले होते.

आता अमिताभ यांचा प्रभाव वाढायला लागला होता. त्यावेळी त्यांच्या आणि जया भादुरीच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा रंगण्यास सुरुवात झाली होती. 1972 मध्ये बावर्चीच्या सेटवर अमिताभ हे जयाला भेटायला जात असत. तेव्हा राजेश खन्ना त्या चित्रपटात मुख्य भूमिकेत  होते. तर जया ही त्यांची अभिनेत्री होती.

असे म्हटले जाते अमिताभ यांची लोकप्रियता आता राजेश खन्ना यांना सलायला लागली होती. बावर्चीच्या वेळी राजेश खन्ना आणि अमिताभ यांची भेट झाली तेव्हा राजेश खन्ना (काका) यांनी बिग बी यांना मनहुस असे म्हटले होते जया यांना ती गोष्ट अजिबात आवडली नव्हती. त्यांनी रागाच्या भरात राजेश खन्ना यांना चांगलेच फैलावर घेतले होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : एसआयआरवरून निवडणूक आयोगातच मतभेद; दोन आयुक्तांनी दहा महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

'काही वाईट असेल ते माझ्याबाबत होऊ दे' बहिणीच्या प्रीमॅच्युअर बाळासाठी जुईची खाटूश्यामबाबांकडे प्रार्थना, अनुभव सांगत म्हणाली...

Asian Games 2026 : क्रिकेटची आवड असलेल्या Jay Meena ने इतिहास रचला! भारताला सॉफ्ट टेनिसमध्ये जिंकून दिले पहिले आशियाई पदक... जाणून घ्या कोण आहे तो?

Marathi News Live Updates : जम्मू-काश्मीरमधील गँगस्टर करनजीत गुग्गाला दिल्लीत अटक

Gold Rate Today: दसऱ्याआधी सोनं स्वस्त! सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; तुमच्या शहरात ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT