मनोरंजन

थलायवाचा गौरव, रजनीकांत दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित

रजनीकांत यांना आज दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आहे.

युगंधर ताजणे

आपल्या अभिनयानं केवळ भारतातीलच नाहीतर जगभरातील चाहत्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या शिवाजी राव गायकवाड अर्थात रजनीकांत यांना आज दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आहे. दिल्लीत झालेल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी चित्रपट, समाजकारण, अर्थकारण आणि राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या. यापूर्वी रजनीकांत यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक पोस्ट शेयर केली होती. गेल्या वर्षी या पुरस्काराची घोषणा झाली होती. मात्र कोरोनामुळे या पुरस्काराचे वितरण करता आले नाही. यावेळी ते पुरस्कार देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले.

सर्वोत्कृष्ठ राष्ट्रीय चित्रपट, सर्वोत्कृष्ठ अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक, बालकलाकार, भाषिक चित्रपट या पुरस्कारांचेही यावेळी वितरण करण्यात आले. रजनीकांत यांनी आपल्या मनोगतातून आजवरच्या चित्रपट कारकीर्दीचा आढावा घेतला. त्यामध्ये त्यांनी आपले चाहते, नातेवाईक यांना धन्यवाद दिले. आजवरच्या प्रवासात आपल्याला त्यांचा सर्वात मोठा पाठींबा मिळाल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते रजनीकांत यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रेक्षकांमध्ये रजनीकांत यांच्या परिवारातील सदस्यही उपस्थित होते.

याबरोबरच अभिनेत्री कंगना राणावत, मनोज वाजपेयी यांना देखील या सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री आणि अभिनेता या पुरस्कांनी गौरविण्यात आले. हिंदी, तमिळ, कन्नड, मल्याळम अशा विविध भाषांमध्ये अभिनेता म्हणून रजनीकांत यांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. आपल्या अनोख्या स्टाईलनं त्यांनी जगभरातील प्रेक्षकांची दाद मिळवली आहे. अशा या प्रचंड लोकप्रिय अभिनेत्याला भारतीय चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कारानं गौरविण्यात आल्यानं त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi Film Industry: मातीशी पुन्हा जुळलेली ‘नाळ’

Adai Dosa Recipe: पीठ आंबवण्याची गरज नाही; झटपट बनवा प्रोटीनयुक्त 'अडई डोसा'! पौष्टिक आणि चवदार दाक्षिणात्य नाश्ता... 

Daily Horoscope: गुरुवार ५ नाेव्हेंबर राशीभविष्य

IND vs NZ, 1st ODI: विराटचं अर्धशतक, अर्शदीपच्या ४ विकेट्स, तरी अंशुल कंबोज कसा ठरला 'प्लेअर ऑफ द मॅच'? म्हणाला, एक वाईट सामना...

Nashik FDA: नाशिकमध्ये FDA चा मिठाई व्यावसायिकांना दणका! पाच प्रमुख स्वीट्स उत्पादकांचे परवाने निलंबित, कारवाईने खळबळ

SCROLL FOR NEXT