मनोरंजन

घाबरायचं काहीच कारण नाही, रजनीकांत यांच्या पत्नीनं सांगितलं...

जगभरात आपल्या हटके स्टाईल आणि अभिनयामुळे प्रख्यात असलेल्या थलायवा अर्थात रजनीकांत यांना काल रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - जगभरात आपल्या हटके स्टाईल आणि अभिनयामुळे प्रख्यात असलेल्या थलायवा अर्थात रजनीकांत यांना काल रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती बिघडल्याचे कळताच चाहत्यांमध्ये भीती पसरली. आणि त्यांनी ज्या रुग्णालयात रजनीकांत यांना दाखल करण्यात आले आहे त्याठिकाणी गर्दी करण्यास सुरुवात केली. त्या वाढणाऱ्या गर्दीमुळे सुरक्षा आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आता रजनीकांत यांच्या पत्नीनं सोशल मीडियावरुन माहिती दिली आहे. त्यामध्ये त्यांनी चाहत्यांना कसलीही काळजी करु नये. रजनीकांत यांची प्रकृती बरी असल्याचे सांगितले आहे.

दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देवाचा दर्जा असणारे अभिनेते म्हणून रजनीकांत यांचे नाव घेतले जाते. त्यांच्या चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद, त्यांच्या नावाला असलेलं ग्लॅमर हे सारं काही चाहत्यांना प्रभावित करणार आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांना मनोरंजन क्षेत्रातील देशातील सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरविण्यात आले. त्यावेळी केवळ भारतच नाही तर जगभरातून रजनीकांत यांच्या चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्यावर कौतूकाचा वर्षावही केला. देशाचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले होते. त्या सोहळ्याला उत्तर देताना रजनीकांत यांनी आपल्याला संघर्षाच्या काळात साथ देणाऱ्या त्या बस ड्रायव्हरचा उल्लेख केला ज्याने त्यांना मोलाची मदत केली होती.

काल रात्री रजनीकांत यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्याविषयी त्यांच्या पत्नीनं सांगितलं की, त्यांना रुटीन चेक अपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चाहत्यांनी काळजी करु नये. यापूर्वी 2020 मध्ये 70 वर्षीय रजनीकांत यांना सततच्या थकावट आणि ब्लडप्रेशरमुळे हैद्राबादमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी ते तिथे एका चित्रपटाची शुटींग करत होते. यापूर्वी रजनीकांत यांची एक शस्त्रक्रिया झाली असून त्यात किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT