Sairat fame Suraj esakal
मनोरंजन

Sairat fame Suraj: सैराटच्या प्रिन्सवर अटकेची टांगती तलवार! सूरज पवार गोत्यात

सैराटमध्ये प्रिन्सची भूमिका करणारा सुरज पवार एका प्रकरणात दोषी म्हणून समोर आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Sairat Movie: मराठी चित्रपट विश्वात ज्या चित्रपटानं साऱ्या प्रेक्षकांना वेडं केलं त्या चित्रपटातील कलाकार मंडळी ही नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतात. मात्र आता या चित्रपटातील प्रसिद्ध कलाकार सुरज पवार ज्यानं प्रिन्सची भूमिका केली होती तो गोत्यात आला आहे. नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकऱणी त्याला अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय क्षिरसागर (रा. नाशिक), आकाश शिंदे आणि ओमकार तरटे (रा. संगमनेर ) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपींवर भादवि कलम 420, 465, 467, 468, 471 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेवासा तालुक्यातील महेश वाघडकर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार फसवणूक करणे, बनावट शिक्के आणि दस्तऐवज तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी मंत्रालयात नोकरीला लावण्यासाठी पाच लाखांची मागणी केली होती.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रालयात नोकरी लावून देतो असे सांगून सुरजनं आपली फसवणूक केल्याची माहिती फिर्यादीनं दिली आहे. यामध्ये मोठे रॅकेट असल्याची माहिती समोर येत आहे. सैराटमध्ये आर्चीचा भाऊ म्हणून सुरजनं काम केलं होतं. आरोपींनी भारताच्या राजमुद्रा बनावट करुन त्याचा दुरुपयोग केला आहे. म्हणजे हा एक प्रकारे देशद्रोहासारखा गुन्हा मानला जातो. त्यामुळे राहुरी पोलीस लवकरच सैराटचा प्रिन्स सेलिब्रेटी सुरज पवारला अटक करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT