Surbhi Chandna esakal
मनोरंजन

Surbhi Chandna: इश्कबाज फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात; करण शर्मासोबत बांधली लग्नगाठ

Surbhi Chandna: सुरभी आणि करण यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

priyanka kulkarni

Surbhi Chandna: छोट्या पडद्यावरील 'इश्कबाज' (Ishqbaaaz) या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या सुरभी चंदनानं (Surbhi Chandna) तिचा बॉयफ्रेंड करण शर्मासोबत (Karan Sharma) लग्नगाठ बांधली आहे. सुरभी आणि करण यांचा लग्नसोहळा राजस्थानमधील जयपूर येथे शनिवारी (2 मार्च) धुमधडाक्यात पार पडला. सुरभी आणि करण यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सुरभी आणि करणचा खास लूक

जयपूरमध्ये सुरभी आणि करण यांनी लग्नगाठ बांधली. लग्नसोहळ्यासाठी सुरभी आणि करण यांनी खास लूक केला होता. सी-ग्रीन कलरचा लेहंगा, पिंक ओढणी आणि स्टोनची ज्वेलरी असा लूक सुरभीनं लग्नसोहळ्यात केला होता. तर करणनं ग्रे कलरची शेरवानी परिधान केली होती.

व्हिडीओ व्हायरल

सुरभी आणि करण यांच्या लग्नसोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामधील एका व्हिडीओमध्ये सुरभी ही 'मुझे प्यार हुआ था' या गाण्यावर डान्स करताना दिसली. सुरभी आणि करण यांच्या विवाह सोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

पाहा व्हिडीओ:

13 वर्षांपासून करत होते डेट

सुरभी चंदना आणि करण हे गेल्या 13 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 15 जानेवारी 2024 रोजी सोशल मीडियावर करण आणि सुरभी यांनी त्यांच्या एंगेजमेंटची अनाऊंसमेंट केली.

सुरभीने काही दिवसांपूर्वी ओटीटीवर पदार्पण केले आहे. ती बरुण निसर्गीसोबत 'रक्षक इंडियाज ब्रेव्स चॅप्टर 2' या वेब सीरिजमध्ये दिसली आहे. सुरभीने नागिन या मालिकेत देखील काम केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT