Jai Bhim Film
Jai Bhim Film Jai Bhim Film
मनोरंजन

'ऑस्कर'च्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर सूर्याचा 'जय भीम'

स्वाती वेमूल

टी.जे. ज्ञानवेल दिग्दर्शित 'जय भीम' (Jai Bhim) या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. अभिनेता सूर्याची (Suriya) मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने 'गोल्डन ग्लोब २०२२' या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात 'बेस्ट नॉन इंग्लिश लँग्वेज फिल्म' या विभागात नामांकन मिळवलं आहे. त्यानंतर आता ऑस्करच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर (Oscars YouTube channel) दिग्दर्शकाच्या कथेसह चित्रपटातील एक दृश्य प्रदर्शित करण्यात आले आहे. तमिळ भाषेतील हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. आदिवासी लोकांवर होणाऱ्या अन्यायाची कथा यामध्ये दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाच्या कथानकावरून अनेक वादसुद्धा निर्माण झाले.

२ नोव्हेंबर २०२१ रोजी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यावरून अनेक वाद निर्माण झाले. १९९३ मध्ये तमिळनाडूमध्ये घडलेल्या घटनेवर या चित्रपटाची कथा आधारित आहे. यामध्ये सुर्या, प्रकाश राज यांच्यासोबतच राजीशा विजयन, लिजोमोल होसे, राव रमेश आणि के मनिकंदन यांच्या भूमिका आहेत.

जय भीम या चित्रपटाला आयएमडीबीनं 9.6 रेटिंग दिलं आहे. हा चित्रपट हिंदी,तमिळ, तेलूगु आणि कन्नड, मल्याळम भाषेत प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटात एका वकिलाची कथा मांडण्यात आली आहे ज्यांनी तळागाळातील पिडीतांना न्याय देण्यासाठी महत्वाची भूमिका घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

SCROLL FOR NEXT