Surveen Chawla  Instagram
मनोरंजन

'कमरेचं, छातीचं माप विचारून..'; सुरवीनने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

सुरवीनने 'हेट स्टोरी २', 'अग्ली', 'पार्च्ड' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

स्वाती वेमूल

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत मोठ्या प्रमाणात कास्टिंग काऊचचा सामना करावा लागल्याचा खुलासा अभिनेत्री सुरवीन चावलाने (Surveen Chawla) केला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुरवीनने इंडस्ट्रीतील तिचे अनेक अनुभव सांगितले. पहिल्यांदा मुंबईत जेव्हा ती चित्रपटात काम करण्यासाठी आली होती, तेव्हा तिला बॉडी शेमिंगलाही सामोरं जावं लागलं होतं. तिचं वजन ५६ किलो असल्याने तिला भूमिका मिळणार नाहीत, असं तिला सांगण्यात आलं होतं. सुरवीनने २००३ मध्ये 'कही तो होगा' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर 'कसौटी जिंदगी की', 'काजल' यांसारख्या मालिकांमध्ये तिने काम केलं. 'एक खिलाडी एक हसीना' या डान्स शोमध्येही तिने भाग घेतला होता. तिने काही बॉलिवूड चित्रपट आणि वेब सीरिजमध्येही भूमिका साकारल्या आहेत.

आरजे सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत सुरवीन म्हणाली, "मी टेलिव्हिजनमध्ये काम करत असताना मुंबईत एका चित्रपटाच्या ऑडिशनसाठी गेली होती. हे अनेकांच्या बाबतीत घडतं. त्यांना त्यांचं वजन विचारलं जातं, कमरेचं माप विचारलं जातं, छातीचं माप विचारला जातं. तुम्ही स्वत:च स्वत:विषयी प्रश्न उपस्थित करत राहाल, अशी वागणूक ते देतात. हा सगळा मूर्खपणा आहे. या इंडस्ट्रीत येण्याची नेमकी मापदंडं काय आहेत? दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत मी अनेकदा कास्टिंग काऊचचा सामना केला. तो काळ खरंच खूप कठीण होता."

सुरवीनने कन्नड चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. 'परमेशा पानवाला' या चित्रपटात तिने काम केलं. 'हेट स्टोरी २', 'अग्ली', 'पार्च्ड' यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या भूमिका गाजल्या. तिने 'हक से' आणि 'सेक्रेड गेम्स' या वेब सीरिजमध्येही काम केलं. ती लवकरच आर माधवनसोबत 'डीकपल्ड' या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. येत्या १७ डिसेंबर रोजी ही सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates: पुढच्या वर्षी लवकर या! पुणे, मुंबईसह आज राज्यात गणेश विसर्जन मिरवणुकीची धूम

Ganesh Visarjan 2025: गणेश विसर्जनाच्या दिवशी नैवेद्यात बनवा 'हे' चविष्ट हलवा, बाप्पा प्रसन्न होतील

Vijay Wadettiwar: सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक: काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार; 'ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष उभा केल्याचा आरोप'

Latest Maharashtra News Updates : अंतरवाली सराटीत ओबीसींचे उपोषण तूर्त स्थगित, मंत्री अतुल सावे यांच्या आश्वासनानंतर निर्णय

पंतप्रधानांनी लोकार्पण केलेल्या १५०२४ पैकी ५०० बेघर लाभार्थीच गेले घरकुलात रहायला! देशातील सर्वात मोठ्या ‘रे नगर’ गृहप्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील ९००० घरे तयार

SCROLL FOR NEXT