दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा Sushant Singh Rajput फोटो लहान मुलांच्या बंगाली पुस्तकात छापण्यात आला आहे. सुशांतसोबत त्याची पूर्वाश्रमीची प्रेयसी आणि अभिनेत्री अंकिता लोखंडेचाही Ankita Lokhande फोटो या पुस्तकात पाहायला मिळत आहे. 'पवित्र रिश्ता' Pavitra Rishta या मालिकेतील हा दोघांचा एकत्र फोटो आहे. याच मालिकेतून अंकिताने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं आणि शूटिंगदरम्यान सुशांत-अंकिता एकमेकांच्या प्रेमात पडले. सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१६ मध्ये सुशांत आणि अंकिताचं ब्रेकअप झालं. गेल्या वर्षी जूनमध्ये सुशांतचं निधन झालं. मुंबईतल्या राहत्या घरी त्याचा मृतदेह आढळला होता. (Sushant Singh Rajput and Ankita Lokhande feature in Bengali textbook for kids)
सुशांतच्या निधनानंतर अनेक कार्यक्रमांमध्ये आणि पुरस्कार सोहळ्यात त्याला श्रद्धांजली वाहिली गेली. नुकत्याच पार पडलेल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातही सुशांतला श्रद्धांजली वाहिली गेली. आता बंगाली पुस्तकात सुशांत-अंकितालाचा फोटो छापण्यात आला आहे. पालकत्व, कुटुंब आणि मुलं या विषयांवरील प्रश्नाबाबत सुशांत-अंकिताचा फोटो छापला आहे.
हेही वाचा : 'आई कुठे काय करते'ची अभिनेत्री करतेय रुग्णांच्या नातेवाईकांची मदत
'पवित्र रिश्ता' या मालिकेत अंकिताने अर्चना तर सुशांतने मानव ही भूमिका साकारली होती. या दोघांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. मालिकांमधून करिअरची सुरुवात करणाऱ्या सुशांतने बॉलिवूड चित्रपटांपर्यंत यशस्वी प्रवास केला होता. मात्र त्याच्या अचानक निधनामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.