Sushant Singh Rajput Case: Rhea Chakraborty  Esakal
मनोरंजन

Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंग प्रकरणात रिया चक्रवर्तीच्या भावाला मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

Vaishali Patil

Rhea Chakraborty: बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग याने राहत्या घरी आत्महत्या केली. त्याच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला. सुशांतच्या आत्महत्येनंतर या प्रकरणात अनेक खुलासे झाले. मात्र या प्रकरणात जास्त चर्चेत झाली ती त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची.

पोलिसांनी तिची कसून चौकशी केली होती. त्यानंतर तिच्या नावाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होती. नेटकऱ्यांनी देखील तिच्यावर कडाडून टीका केली होती. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येमध्ये तिच्यासोबतच तिचा भाऊ शोविक याच्या नावाचा देखील सामावेश होता. त्यानंतर शोविकचे नावही या प्रकरणात चर्चेत आले होते.

मात्र आता नुकतच रियाचा भाऊ शोविकला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. शोविकला आता परदेशात जाण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे.

यापुर्वी रिया आणि तिच्या कुटुंबीयांना पासपोर्ट वापरण्याची परवानगी नव्हती. असा आदेशच न्यायालयाने दिला होता.

आता शोविकला अनेक अटींवर कामासाठी ऑस्ट्रेलियाला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे, ज्यात त्याच्या पालकांचे पासपोर्ट अधिकाऱ्यांनाकडे जमा करण्यात आली आहेत.


सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स विभागाने रियाप्रमाणेच शोविकचेही नावही आरोपी म्हणुन सांगितले होते. त्याचा ड्रग विक्रेत्यांशी संपर्क होता आणि सुशांतला देण्यासाठी तो ड्रग घ्यायचा असा आरोप त्याच्यावर होता. त्यानंतर न्यायालयाने शोविकला परदेशात जाऊन त्याचा पासपोर्ट वापरण्याची परवानगी नव्हती.

आता शोविकला अलीकडेच 17 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2023 या कालावधीत 7 दिवसांसाठी ऑस्ट्रेलियाला जायचे होते त्यामुळे आता त्यासाठी न्यायालयाने शोविकला परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे.

मात्र या परवानगीसोबतच शोविकला त्याच्या सर्व वेळापत्रकांची माहिती आणि परदेश दौऱ्याची सर्व माहिती, या कालावधीत तो कोणासोबत संपर्क साधणार आहे, त्याचा पत्ता, फोन नंबर ही सर्व माहीती त्याला द्यावी लागणार आहे.

जून 2020 सुशांतने मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केली आणि त्यावेळी रिया आणि सुशांत रिलेशनशिपमध्ये होते. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांनी रियाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता.

त्यानंतर रिया आणि तिचा भाऊ शोविक यांना सप्टेंबर 2020 पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना जामीन देण्यात आला. सध्या रिया लोकप्रिय टीव्ही शो रोडीजमध्ये जजची भुमिका साकारत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT