sushant singh rajput last movie dil bechara sequel director mukesh chhabra announcement  SAKAL
मनोरंजन

Dil Bechara 2: सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा सिनेमा 'दिल बेचारा'चा होणार सिक्वेल! फॅन्स भावूक

सुशांत सिंग राजपूतच्या शेवटचा सिनेमा 'दिल बेचारा'चा पुढचा भाग भेटीला येणार आहे. | Sushant Singh Rajput's last film 'Dil Bechara' will be a sequel...

Devendra Jadhav

Dil Bechara 2 News: दिग्दर्शक मुकेश छाबरा दिग्दर्शित सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' चांगलाच गाजला. सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर हा सिनेमा रिलीज झालेला. हा सिनेमा सर्वांनाच भावूक करुन गेला.

आता सुशांतच्या फॅन्ससाठी खास बातमी. सुशांतच्या आगामी दिल बेचारा सिनेमाचा सिक्वेल येणार आहे. याविषयी दिग्दर्शक मुकेश छाबरा यांनी ट्विट केलंय.

'दिल बेचारा 2-' ची घोषणा करताना दिग्दर्शक मुकेश छाबरा यांनी X वर एक पोस्ट शेअर केली आणि फक्त इतकेच लिहिले, 'दिल बेचारा 2.'

मुकेश छाबरा यांच्या पोस्टनंतर सुशांतचे चाहते सतत ट्विट करून चित्रपटाबद्दलच्या त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. मुकेश छाबरा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये चित्रपटाच्या कास्टिंग किंवा कथेबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. अशा परिस्थितीत आगामी चित्रपटात सुशांतची जागा कोण घेणार याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही.

'दिल बेचारा' जुलै 2020 मध्ये OTT वर रिलीज झाला होता. हा चित्रपट जॉन ग्रीनच्या 'द फॉल्ट इन अवर स्टार्स' या कादंबरीवर आधारित होता. या चित्रपटात सुशांत सिंग राजपूतसोबत संजना सांघी दिसली होती.

2020 मध्ये 14 जून रोजी सुशांत सिंग राजपूतच्या निधनाने सर्वच भावूक झाले. सुशांतच्या या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा होताच त्याचे चाहते पुन्हा एकदा भावूक झाले आहेत.

'दिल बेचारा'च्या नावावर अनेक रेकॉर्ड

'दिल बेचारा' चित्रपटात सुशांतला शेवटच्या वेळी पाहून चाहते खूप भावूक झाले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होताच OTT क्रॅश झाला. वापरकर्त्यांची संख्या इतकी जास्त होती की प्लॅटफॉर्मवर तांत्रिक बिघाड झाला. याबाबत चित्रपट निर्माते हंसल मेहता यांनी ट्विट केले होते. (Records to Dil Bechara's name)

या चित्रपटाला IMDB वर 10 पैकी 9.8 स्टार मिळाले आहेत. २४ तासांत ९५ दशलक्ष लोकांनी सिनेमा पाहिला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाच्या ट्रेलरने हॉलिवूडचा सर्वात लोकप्रिय चित्रपट अॅव्हेंजर एंडगेमच्या ट्रेलरलाही मागे टाकले होते. यासह त्याने हा विश्वविक्रम केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi on Rahul Gandhi : 'विरोधी पक्षात असे काही नेते आहेत, जे राहुल गांधींपेक्षा चांगले बोलतात, परंतु...’’

Pune University Flyover : गणेशखिंड रस्त्यावरील उड्डाणपूल सुरू; वाहनचालकांना कोंडीपासून काहीसा दिलासा

Mumbai News : रोषणाईपासून बससेवेपर्यंत… गणेशोत्सवासाठी बेस्टची फुल तयारी

Crime News : नागा साधूच्या वेशात फसवणूक; नाशिकमध्ये संमोहन करून अंगठी व रोकड लंपास

Dhanorkar Join BJP: रविंद्र चव्हाणांचा विराट शो! धानोरकरांचा भाजपात प्रवेश, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा किल्ला कोसळला

SCROLL FOR NEXT