Sushant singh rajput last movie dil bechara will release on Disney plus hotstar
Sushant singh rajput last movie dil bechara will release on Disney plus hotstar 
मनोरंजन

‘या’ तारखेला होणार सुशांतचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ प्रदर्शित

सकाळवृत्तसेवा

मुंबई : सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर त्याच्या चाहत्यांना त्याने अभिनय केलेला शेवटाचा चित्रपट ‘दिल बेचारा’ पाहण्यासाठी वाट पाहत   आहेत. दरम्यान हा चित्रपट ओटीटी माध्यमांवर प्रदर्शित करण्यात येणार असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून करण्यात येत होती. हा चित्रपट येत्या 24 जूलै रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे. सुशांत सिंह राजपूतचा हा शेवटचा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार वर चाहत्यांना पाहाता येणार आहे. त्यासोबतच हा चित्रपट सब्स्क्रायबर्स सह इतरही सर्वांसाठी उपलब्ध असणार आहे. 

दिल बेचारा या चित्रपटाबद्दल माहिती देत डिस्ने प्लस हॉटस्टार यांनी अधिकृत इंस्टाग्राम अकांउंटवर चित्रपटाचे पोस्टर पोस्ट करत या विषयी माहिती दिली आहे. ‘प्रेम, आशा आणि अंतहीन आठवणींची गोष्ट असलेला ‘दिल बेचारा’ 24  जूलै रोजी सर्वांना पाहाता येणार आहे, हा चित्रपट सब्स्क्रायबर्स आणि नॉन सब्सक्रायबर्स सह सर्वजण पाहू शकतील.’

सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी मुंबई येथील त्याच्या राहत्या घरामध्ये आत्महत्या केली होती. त्यानंतर मानसीक तणाव या विषयावर मोठ्या प्रमाणात चर्चा केली जात आहे. तसेच बॉलिवुड मध्ये चालणार परिवारवाद या वर देखील विवाद सुरु झाले आहेत. सुशांतने त्याच्या टिव्ही मालिका ‘कीस देश मे है मेरा दिल’ पासून अभिनयाची सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने काम केलीली दुसरी मालिका ‘पवित्र रिश्ताने’ त्याची ओळख तयार झाली होती. त्यानंतर ‘काय पो चे’ चित्रपट सृष्टीत अभिनयाची सुरुवात केली होती.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

SCROLL FOR NEXT