sandeep nahar 
मनोरंजन

'एम. एस. धोनी'मध्ये सुशांतसोबत काम केलेल्या अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू

स्वाती वेमूल

अभिनेता सुशांत सिंह राजूपतसोबत 'एम. एस. धोनी' आणि अक्षय कुमारसोबत 'केसरी' या चित्रपटात काम केलेला अभिनेता संदीप नाहरचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. संदीपने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. मुंबईतील गोरेगाव इथल्या राहत्या घरी गळफास घेतलेला संदीपचा मृतदेह आढळला. 

संध्याकाळी संदीप त्याच्या रुममध्ये गेला आणि त्याने आतून दरवाजा बंद करून घेतला. बराच वेळ होऊनही तो रुमच्या बाहेर न आल्याने पत्नीला संशय आला. दरवाजा ठोठावूनही संदीपने आतून कोणताच प्रतिसाद दिला नाही. तेव्हा त्याच्या पत्नीने संदीपच्या मित्रांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर कारपेंटरच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला आणि रुममध्ये संदीपने गळफास घेतल्याचं दिसून आलं. संदीपला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. ही संपूर्ण घटना झाल्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान पोलिसांना यासंदर्भातली माहिती देण्यात आली. 

फेसबुक पोस्टमुळे खळबळ
संदीपने फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत पत्नीसोबत असणारे मतभेत सांगितले होते. "मला तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये पाहिलं असेल. एम. एस. धोनी चित्रपटात मी छोटू भैय्याची भूमिका साकारली होती. मी सध्या मानसिकदृष्ट्या स्थिर नाही आणि याला कारणीभू माझी पत्नी कंचन शर्मा आहे. गेल्या दीड-दोन वर्षांपासून मी हा त्रास सहन करतोय. आमची सतत भांडणं होत आहेत. आता हे सर्व माझ्या सहनशक्तीपलीकडे गेलंय. माझी पत्नी आणि आई यांनी मला कधीच समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही", असं तो या व्हिडीओत म्हणाला होता. 

संदीपच्या आकस्मिक मृत्यूने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. संदीपचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Strike: 11 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी नाही तरी बँका बंद! सलग 4 दिवस बँका बंद राहणार? पाहा काय सुरू राहणार

Eknath Shinde: ठाकरे गटानंतर शिंदेसेनेला धक्का, बालेकिल्ल्यातील नगरसेवकाचे पद रद्द

iPhone 18 India Price: भारत ठरला iPhone 18 खरेदीसाठी जगातील दुसरा सर्वात महागडा देश! अमेरिकेपेक्षा तब्बल 50,000 रुपये जास्त!

US Open 2026: पहाटे ३.३३ वाजेपर्यंत रंगला थरार; ४ तास २८ मिनिटांच्या लढतीनंतर शेल्टनने गतविजेत्या अल्काराझला दिला धक्का

Marathi News Live Updates : पालिकेचा विरोध डावलून कॉरिडॉर होणारच; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पोस्टने पंढरपुरात राजकीय वातावरण तापले

SCROLL FOR NEXT