sushant aishwarya 
मनोरंजन

व्हिडिओः डान्स करत असलेल्या ऐश्वर्या रायच्या मागे असलेल्या सुशांत सिंहला ओळखलंत का?

सकाळ डिजिटल टीम

मुंबई-  अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अचानक जाण्याने त्याचे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सुशांतच्या आत्महत्येमागचं कारणंही अद्यापही समजू न शकल्याने चाहते तणावात आहेत.  सुशांतचे चाहते त्याच्या आठवणींमध्ये दुःखी आहेत. सोशल मिडियावर ते त्याच्या जुन्या आठवणी शेअर करत आहेत. अशीच सुशांतची एक जुनी आठवण सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सुशांत अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या मागे डान्स करताना दिसत असल्याचा दावा नेटकरी करत आहेत.

बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याआधी सुशांत प्रसिद्ध कोरिओग्राफर शामक दावर यांच्या डान्स ग्रुपचा भाग होता. सुशांतच्या मृत्युनंतर शामक दावर यांनी त्याला श्रद्धांजली देखील वाहिली होती. सोशल मिडियावर २००६ मधील कॉमनवेल्थ गेम्सच्या अंतिम सोहळ्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय.

या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या डान्स करताना दिसतेय. तिच्यामागे अनेक बॅग्राऊंड डान्सर्स दिसून येत आहेत. रिपोर्टनुसार या बँग्राऊंड डान्सर्समध्ये सुशांत देखील आहे. मात्र हा व्हिडिओ जुना असल्या कारणाने यात बँग्राऊंड डान्सर्स फार अंधूक दिसून येत आहेत. त्यामुळे सुशांतला तसं ओळखणं देखील कठीण आहे.

सुशातने एका  सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान सांगितलं होतं की कॉमनवेल्थमध्ये ऐश्वर्यासोबत बँग्राऊंड डान्सर म्हणून त्याने काम केलेलं. त्याला इतर डान्सर्ससोबत ऐश्वर्याला लिफ्ट करायचं होतं. तो तिचा खूप मोठा चाहता होता. तिला डान्समध्ये वर उचलल्यानंतर खाली ठेवायलाच तो विसरुन गेला होता.

सुशांतने सांगितलं होतं की यानंतर तो कॉलेजमध्ये चांगलाच प्रसिद्ध झाला होता. सुशांत ऐश्वर्याच्या धुम अगेन या गाण्याचा देखील एक भाग होता. इतकंच नाही तर सुशांतचा शाहरुख खानचा देखील खूप मोठा चाहता होता. सुशांतचा एक जुना व्हिडिओ  देखील व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो त्याच्या मित्रासोबत शाहरुखच्या गाण्यावर त्याची नक्कल करत आहे.   

sushant singh rajput old video viral dancing as background dancer of aishwarya rai  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG संकटावर अखेर पडदा! सरकारने हटवले सर्व निर्बंध; 'या' क्षेत्रांना मिळाला मोठा दिलासा

Monsoon Rain : मॉन्सूनचा वेग मंदावला, सहा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट; राज्यात हवामान अंदाज कसा असेल

Venezuela Earthquake: भूकंपाने क्षणार्धात होत्याचे नव्हते...! डोळ्यांसमोर कोसळली घरे़; रात्रभर नागरिक रस्त्यांवर

Ketan Agarwal Murder Case : ... तर तिलाही त्याच किल्ल्यावरुन ढकलून द्या, सियाच्या वडिलांची धक्कादायक मागणी

MPSC Mega Bharti: ‘एमपीएससी’कडून २,६१९ पदांसाठी मेगाभरती; गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, २७ जून ते १७ जुलै करा ऑनलाइन अर्ज..

SCROLL FOR NEXT