sushant
sushant 
मनोरंजन

सुशांतचं ज्या व्यक्तीसोबत झालेलं शेवटचं बोलणं तो आता 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी करतोय काम

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युच्या दिवशी त्याच्या बांद्रा येथील घरात पाच लोक उपस्थितीत होते. सुशांतच्या मृत्युनंतर अनेक लोक चर्चेत आले आहेत. त्याचा कुक नीरज पासून ते हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडापर्यंत सगळेच सीबीआयच्या रडारवर आहेत. मात्र या सगळ्यांमध्ये सुशांतचा कर्मचारी केशव मिडियापासून स्वतःला लांब ठेवतोय. आता अशी माहिती समोर येतेय की केशव एका अभिनेत्रीच्या मुंबईतील घरी काम करतोय.  

एका वाहिनीने त्यांच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हा खुलासा केला आहे की केशव अभिनेत्री सारा अली खानच्या घरी काम करत आहे. साराच्या घराच्या सुरक्षा रक्षकाने केशव साराच्या घरी काम करत असण्याला दुजोरा दिला आहे. जेव्हा वाहिनीने फोनवरुन केशवशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो म्हणाला, 'सोडा मला आता, माझ्यासाठी प्रकरण संपलं आहे.' 

रिपोर्टनुसार नीरजच्या काकांनी सांगितली होतं की केशव आता अभिनेत्री सारा अली खानच्या घरी काम करतो. तो जेवण देखील बनवतो. त्यामुळे जेव्हा त्याला मॅडमने बोलवलं तो निघून गेला. दोन दिवसांपूर्वीच तो गोव्याहून मुंबईला आला आहे. नीरज देखील सुशांत सिंह राजपूतचा कुक होता.

सुत्रांच्या माहितीनुसार, सीबीआय पुन्हा एकदा केशव आणि नीरजला चौकशीसाठी बोलवू शकते. याआधी नीरजने एका मुलाखतीत सांगितलं होतं की '१४ जुनला केशवने सुशांतला ब्रेकफास्टसाठी विचारलं होतं तेव्हा त्याने नारळ पाणी, संत्र्याच्या ज्युस आणि केळं घेणार असल्याचं म्हटलं. त्यानंतर सुशांतने नारळ पाणी आणि ज्युस घेतला आणि म्हणाला केळं नंतर खाईन.' केशवनेच सुशांतसोबत शेवटचं बोलणं केलं होतं.   

sushant singh rajput staff member keshav presently works sara ali khan residence  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT