sushant rajput1.jpg 
मनोरंजन

बेसब्रियां...

अतुल क. तांदळीकर

अलीकडच्या काळात आलेले "थ्री इडियट' आणि "छिछोरे' हे दोन चित्रपट नैराश्‍यात गेलेल्या पिढीला बाहेर काढण्यासाठी खूप प्रेरक ठरलेत. यातील "छिछोरे'मध्ये सुशांतसिंहने काम केले, त्यात तो स्वतः "कितनी भी कठनाइयॉं, डिप्रेशन यदी जिंदगी में आये तो भी जिंदगी से एक्‍झिट कभी मत करना' असा मेसेज देतो, या पिढीने हा मेसेज खूप "ऍप्रिशिएट' केला आणि त्याच्या अभिनयाचे कौतुक भरभरून केले, त्याच अभिनेत्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलावे हे नक्कीच धक्कादायक आहे. 


वयाची पस्तिशी देखील गाठायची असताना या कलाकाराला अशी एक्‍झिट का घ्यावी लागली, याची कारणमीमांसा होत राहील, पण चित्रपटात आणि प्रत्यक्ष आयुष्यात असा विरोधाभास वाट्यास येणे हा दैवदुर्विलासच म्हणावा लागेल. 

सुशांतचा "एम. एस. धोनी...' हा चित्रपट खूप लोकप्रिय ठरला. या अभिनेत्याने भूमिकेसाठी जे परिश्रम घेतले ते देखील प्रशंसनीय ठरले. त्याने ही भूमिका खूप छान पेलली. प्रत्येक पिढीने बघावा, असा हा सिनेमा. भविष्यात देखील तो प्रेरकच ठरणार एवढे, त्याचे ठसठशीत अस्तित्व. 


मनोज मुंतशीर या गीतकाराची खूप छान गाणी यात आहेत. त्यातील "बेसब्रियां..' या गाण्यात सुशांतने जान ओतली.दिग्दर्शक नीरज पांडे यांचे अप्रतिम दिग्दर्शन म्हणजे हे गाणं. कलाकार आणि दिग्दर्शक यांचं ट्युनिंग उत्तम जमलं की ती कलाकृती अविस्मरणीय होते, हे गाणं असच लक्षात राहणारं. 


आयुष्यात धावपळ करावीच लागते पण अशावेळी नेमका संयम देखील ठेवावा लागतो. महान खेळाडू धोनीच्या आयुष्यातील धावपळीच्या या प्रसंगाचं हुबेहूब वर्णन आणि चित्रण बघणं म्हणजे स्फूर्तिदायक टॉनिक. मनोज यांचे प्रभावी काव्य, सुशांत याचा रेसिंग अभिनय आणि नीरज यांचे कुशल दिग्दर्शन यामुळे हे गाणं खिळवून ठेवतं, कथानकाचा भाग बनतं, सहसा चित्रपटात कथानक आणि गाणं यांचा अर्थाअर्थी काही संबंध नसतो पण हे गाणं त्याला अपवाद आहे. 

रास्ते भागे 
पॉंव से आगे 
ज़िन्दगी से चल 
कुछ और भी मांगे 
रास्ते भागे 
पॉंव से आगे 
ज़िन्दगी से चल 
कुछ और भी मांगे 
क्‍यूँ सोचना है जाना कहॉं 
जाए वहीं ले जाए जहां 
बेसब्रियां.. 

गाण्याच्या या ओळी सुरात कसे गाणार हा प्रश्न संगीतकार, गायक अरमान मलिक ने चुटकीसरशी सोडविला. 
उत्तम चालीत, चित्रीकरणास साजेसं संगीत देऊन त्यांनी आयुष्यातील धीर - अधीर ही अवस्था सुरेल करून टाकली. 

क़दमों पे तेरे, बादल झुकेंगे 
जब तक तुझे, एहसास है 
जागीर तेरी, तेरा खज़ाना 
ये तिश्नागई है, ये प्यास है 
क्‍यूँ रोकना अब ये कारवां 
जाए वहीं ले जाए जहां 
बेसब्रियां... 

ध्येय साध्य करायचे आहे तर थांबायचे नाही हे मस्त चित्रित झालं. पाहणारा प्रेक्षक अजिबात विचलित होत नाही, तो धोनीच्या अथक प्रयत्नात, सुशांतच्या अभिनयात आणि अरमानच्या सुरात रमलेला असतो. त्याला हे गतिमान विश्व खूप भावतं....मात्र जीवनाच्या वाटेवर अर्धा डाव सोडणाऱ्या सुशांतने धक्का दिला, त्याला समर्पित हे दोन शब्द. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बुलाती है मगर जाने का नहीं! कोल्हापुरात डीपफेक, हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंगचे नवे फंडे; यातून सुटायचंय तर बातमी तुमच्यासाठी...

Ambadas Danve: राज्याच्या डोक्यावर 9 लाख कोटींचं कर्ज, देवाभाऊंच्या 200 कोटींच्या जाहिराती, सगळं भगवान भरोसे...

ED summons : ऑनलाईन बेटिंग अ‍ॅप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा अन् सोनू सुदला ईडीचं समन्स,'या' तारखेला होणार चौकशी, अडचणी वाढणार?

Pune Crime : काल बापाने न्यायालयात एन्काउंटरची भीती केली व्यक्त, आज कृष्णा आंदेकर पोलिसांनी शरण; आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

IND vs PAK: जय शाह यांचा पाकिस्तानला दणका; आशिया कपवर बहिष्काराची दिलेली धमकी, आता तोंडावर आपटण्याची वेळ

SCROLL FOR NEXT