Sushmita Sen brother Rajeev Sen reveals reason of happy photot with charu asopa, amid divorce  Instagram
मनोरंजन

Sushmita Sen च्या भावाची घटस्फोटातून माघार, तुटता तुटता टळलं...

राजीव सेन आणि चारु असोपा यांच्या घटस्फोटाची बातमी काही दिवसांपूर्वी जोर धरुन होती. दोघांनी एकमेकांवर टोकाचे आरोपही केले होते.

प्रणाली मोरे

Sushmita Sen Brother Rajeev Sen: बॉलीवूड दीवा सुश्मिता सेनचा भाऊ आणि वहिनीचं नातं सध्या जे वळण घेत आहे ते पाहून सगळेच थोडे कन्फ्यूज आहेत. राजीव सेन आणि चारु(Charu Asopa) असोपाच्या नात्यात नेमकं घडतंय काय हे जाणून घेण्यास लोक भलतेच उत्सुक दिसतायत. आता घटस्फोटाच्या(Divorce) बातम्या कानावर पडत असताना राजीव सेनने चारु असोपासोबतचा एक क्युट कपल फोटो शेअर केला आहे. दोघांच्या या फोटोनं चाहत्यांना मात्र पेचात टाकलं आहे.(Sushmita Sen brother Rajeev Sen reveals reason of happy photot with charu asopa, amid divorce)

चारु असोपानं जेव्हा सोशल मीडियावर आपलं नाव पुन्हा बदलत चारु असोपा-सेन ठेवलं तेव्हा राजीवनं देखील तिच्या सोबतचा हॅप्पी फॅमिलीवाला एक फोटो शेअर केला. या फोटोसोबत राजीवनं एक रेड इमोजी पोस्ट केला आहे. राजीव-चारुचा हा एकत्र फोटो पाहिल्यानंतर लोकांना वाटत आहे की त्यांचं पॅचअप झालेलं आहे. यावर राजीव सेनशी संपर्क साधल्यानंतर त्यानं एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे की,''माझ्या लेटेस्ट पोस्टमधील फोटोनं सगळं सांगितलं आहे,आता मी वेगळं काय बोलू''.

राजीव आणि चारु यांच्या नात्यात लग्नानंतर काहीच दिवसांत गोष्टी बिघडू लागल्या होत्या. राजीव आणि चारुनं मीडियासमोर एकमेकांवर बरेच आरोप-प्रत्यारोप करायचे आणि मग लगेच त्यांच्यात सगळं आलबेलही होतंय अशा बातम्या पसरू लागायच्या. मात्र यावेळी गोष्ट थेट घटस्फोटापर्यंत पोहोचली होती. चारु म्हणाली होती की,''आपली मुलगी जियानाच्या उज्ज्वल भविष्यासाठी तिला पती राजीवपासून वेगळं व्हायचं आहे. तिनं राजीवला खूप वेळा संधी दिली आहे''. तर राजीवनं चारुवर व्हिक्टिम कार्ड खेळल्याचा आरोप करत,तिनं तिचं पहिलं लग्न लपवल्याचं देखील म्हटलं होतं.

या सगळ्या आरोपांमध्येच आता राजीव आणि चारुचं पुन्हा एकत्र दिसणं त्यांच्यात सगळं ठीक होतंय याकडेच बोट दाखवत आहे. गेल्या काही दिवसांत आपल्या आजारी मुलीची चारुनं खूप चांगली काळजी घेतली त्यामुळे राजीवनं चारुची प्रशंसा देखील केली होती. तेव्हापासूनच त्यांच्या पॅचअपच्या बातम्या पसरु लागल्या होत्या. तिथे चारु देखील घटस्फोटाच्या बातम्या कानावर पडत असताना कपाळात छान सिंदुर भरलेली नजरेस पडली होती. असो, दोघांच्या सध्या दिसून आलेल्या एकत्र फोटोनं त्यांच्या नात्यात आनंद परत आलाय हेच दर्शवलं आहे. आता वेळच सांगेल त्यांचं नातं पुढे काय वळण घेते ते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

माकडामुळे गावात ६ दिवस लॉकडाऊनसारखी स्थिती, हल्ल्यात ७० जण जखमी; ५ ते ७ जण गंभीर

Panvel Flood Risk: पनवेलला पुराचा धोका? विमानतळासाठी भराव, बदललेल्या नदीपात्रामुळे संकट ओढावण्याची भीती

SCROLL FOR NEXT