sushmita sen daughter renee  esakal
मनोरंजन

सुष्मिताच्या लेकीने केला बॉयफ्रेंडबद्दल खुलासा

सुष्मिताने रिनीला 2000 साली दत्तक घेतले.

प्रियांका कुलकर्णी

प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन Sushmita Sen तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. सुष्मिताला रिनी आणि अलिशा या दोन मुली आहेत. सुश्मिताची मुलगी रिनी सेन Renee Sen सोशल मीडियावर तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी नेटकऱ्यांसोबत शेअर करत असते. रिनीने नुकतंच तिच्या एक्स आणि आताच्या बॉयफ्रेंडबद्दल खुलासा केला आहे. सोशल मीडियावरील 'आस्क मी एनिथिंग' या सेशनमध्ये काही नेटकऱ्यांनी रिनीला तिच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल विचारले. त्यावर रिनीने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले. (sushmita sen daughter renee answer questions about boyfriends)

एका नेटकऱ्याने रिनीला विचारले, 'तुझा बॉयफ्रेंड आहे का?' त्यावर रिनीने त्याला उत्तर दिले, 'माझे लक्ष सध्या माझ्या कामावर आहे.', तर दुसऱ्याने विचारले, 'तुझ्या आधीच्या बॉयफ्रेंडबद्दल सांग.' यावर रिनी म्हणाली, 'त्याच्याबद्दल बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. 'एका युजरने रिनीला तिच्या भविष्यातील बॉयफ्रेंडबद्दल विचारले तेव्हा त्याला रिनीने सांगितले, 'या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मला टाइम ट्रॅव्हल करावं लागेल.' रिनीने ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 'सुट्टाबाज' या शॉर्ट फिल्ममधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तसेच या 'आस्क मी एनिथिंग'सेशनमध्ये रिनीने तिच्या पुढच्या प्रोजेक्टबद्दल देखील माहिती दिली.

renee answer questions about boyfriends

सुष्मिताने रिनीला 2000 साली दत्तक घेतले. त्यानंतर 2010मध्ये सुष्मिताने अलिशाला दत्तक घेतले. सुष्मिताने अभिनय क्षेत्रामधून काही दिवस ब्रेक घेतला होता. 2020 मध्ये आर्या या वेब सीरिजमधून तिने कमबॅक केलं. सुष्मिता सध्या रोहमन शाल या मॉडेलला डेट करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Latest Marathi News Updates : मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Jabrat Poster: मैत्रीचा गोडवा सांगणारा ‘जब्राट’; पोस्टर लाँच, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

Shivaji Maharaj: मुंबई पोलिसांच्या लाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा

SCROLL FOR NEXT