Sushmita Sen Daughter Renee now Is ready To Debut In Bollywood 
मनोरंजन

सुष्मिता सेनच्या मुलीची बॉलिवूडमध्ये एन्ट्री ; लॉकडॉनवर आधारित चित्रपटात करतेयं काम

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  लॉकडाउनच्या काळातील कुटुंबातील नात्यांवर एका चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खुराणा करणार आहेत. यातील विशेष बाब म्हणजे या चित्रपटात बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री सुश्मिता सेनची मुलगी काम करणार असून तिची बॉलीवूडमध्ये एन्ट्री होणार आहे.

या चित्रपटाचे नाव ‘सुट्टाबाजी’ असे असून करोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडानच्या काळावर हा चित्रपट आधारित असल्याचे म्हटले जाते. या चित्रपटात रिनी एका  बिघडलेल्या मुलीची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या चित्रपटात कोमल छाबडिया आणि राहुल वोहरा रिनीच्या पालकांची भूमिका साकारणार आहेत. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खुराना करणार आहेत.

यापूर्वी सुष्मिता सेनने अनेक मुलाखतींमध्ये रिनीला भविष्यात अभिनेत्री होण्याची इच्छा असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी ती अभिनयाचे धडे घेत असल्याचे सांगितले होते. तसेच रिनीला गाण्याची देखील आवड असल्याचे सुष्मिताने सांगितले. त्यामुळे आगामी चित्रपटात ती गाणे गाणार आहे. सध्या बॉलिवूडमध्ये अनेक स्टारकिड्स पदार्पण करत असल्याचे दिसून येते.

जान्हवी कपूर, अनन्या पांडे, इशान खट्टर असे अनेक स्टारकिड्स सध्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना दिसत आहे. आता अभिनेत्री सुष्मिता सेनची मुलगी रिनी ही देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे म्हटले जात आहे. ती एका चित्रपटात भूमिका साकारणार असल्याचे म्हटले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT