sushmita sen daughter renee sen
sushmita sen daughter renee sen  file image
मनोरंजन

सुष्मिताच्या लेकीचे ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. तिची मुलगी रिनी सोशल मीडियावर तिच्याबद्दल माहिती देत असते. नुकतेच एका मुलाखतीमध्ये रिनीने सोशल मीडियावरील ट्रोलर्सबद्दल सांगितले. तसेच सोशल मीडियावरील नकारात्मकतेबद्दल देखील तिने यावेळी सांगितले. 'लोकांकडे नेहमी काही ना काही सांगण्यासाठी असते. खरं सांगयाचे तर मी सोशल मीडियावरील कमेंट्स वाचत नाही. मला भटकायचे नाही. मी जगातील सर्वात आनंदी मुलगी आहे आणि मला असंच रहायचे आहे. शक्य तितके चांगलं दिसण्याचा प्रयत्न मी करते. बाकी गोष्टींचा फरक पडत नाही', असं ती म्हणाली.(sushmita sen daughter renee sen give comment on social media trolls)

रिनीने ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 'सुट्टाबाज' या शॉर्ट फिल्ममधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. मुलाखतीमध्ये 'सुट्टाबाज'बद्दल रिनाने सांगितले, 'अखेर मी स्वत:ला स्क्रीनवर पाहत आहे. गेली कित्येक दिवस माझं हे स्वप्न होतं की मी स्क्रिनवर दिसावं. हा खूप आनंदी अनुभव आहे. मी खूप खूश आहे.जर माझ्या कामवर कोणी टीका केली किंवा कोणाला माझे काम आवडले नाही तरी देखील मी ते ऐकून घ्यायला तयार आहे. जरी मी फक्त 21 वर्षांची असले तरी हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदी क्षण आहे. मला अजून काम करायला आवडेल. पण मला माझ्यावर मेहनत घेणे गरजेचे आहे. मला पूर्ण वेळ अभिनय क्षेत्रात काम करायला आवडेल'. 'सुट्टाबाज' या शॉर्टफिल्मचे दिग्दर्शन कबीर खुराना यांनी केले आहे.

काही दिवसांपूर्वी रिनीने एका मुलाखतीमध्ये तिच्या आडनावाबद्दल सांगितले होते की, 'मी माझ्या आडनावापासून दूर पळत नाही. मला माहित आहे या आडनावामुळे माझ्यावरील जबाबदारी वाढते. माझ्या आईच्या कामामुळे मला लोकांचे प्रेम मिळते. पण मी याचा दबाव वाटून घेणार नाही, कारण जर मी दडपण घेतले तर मी एकही दिवस काम करण्यास सक्षम राहणार नाही. मी कधीही या आडनावाला कमी लेखू देणार नाही आणि दुसऱ्याला देखील हे करू देणार नाही.'

सुष्मिताने रिनीला 2000 साली दत्तक घेतले. त्यानंतर 2010 मध्ये सुष्मिताने अलिशाला दत्तक घेतले. सुष्मिताने अभिनय क्षेत्रामधून काही दिवस ब्रेक घेतला होता. 2020 मध्ये आर्या या वेब सीरिजमधून तिने कमबॅक केलं. सुष्मिता सध्या रोहमन शाल या मॉडेलला डेट करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT