Sushmita Sen finally breaks silence after Lalit Modi makes their relationship official: NOT married, no rings Instagram
मनोरंजन

ललित मोदीसोबतच्या नात्यावर सुश्मिता सेन स्पष्टच म्हणाली,'ना लग्न,ना Ring..'

ललित मोदीने सुश्मिता सोबत डेटिंगची पोस्ट शेअर केल्यानंतर एका दिवसानंतर सुश्मितानं त्यावर स्पष्टिकरण दिलं आहे.

प्रणाली मोरे

आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी(Lalit Modi) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अभिनेत्री सुश्मिता(Sushmita Sen) सोबतचं आपलं नातं जगजाहीर केलं. आपण दोघे डेट करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. १४ जुलै रोजी ही पोस्ट सोशल मीडियावर पडली आणि एकद बोलबाला झाला. आता यानंतर शुक्रवारी म्हणजे १५ जुलै,२०२२ रोजी सुश्मिता सेनने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या दोन मुलींसोबतचा एक क्युट फॅमिली फोटो शेअर करत लिहिलं आहे की,''मी ज्या ठिकाणी आहे तिथे सगळीकडे आनंद भरलेला आहे. मी लग्न केलेलं नाही,ना कुठल्याही अंगठीचा स्विकार,याक्षणी मी फक्त एवढंच सांगेन माझ्या सभोवताली प्रेमच प्रेम आहे. मला वाटतं इतकं स्पष्टिकरण पुरेसं आहे. आता पुन्हा मी बिझी होईन माझ्या आयुष्यात आणि कामात. माझ्या आनंदात कायम तुम्ही सारे सहभागी असता त्याबद्दल धन्यवाद. माझं माझ्या चाहत्यांवर खूप प्रेम आहे''.(Sushmita Sen finally breaks silence after Lalit Modi makes their relationship official: NOT married, no rings...)

सुश्मितानं ही पोस्ट शेअर केल्यानंतर तिच्या चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. कुणाला तिनं लिहिलेली पोस्ट आवडली आहे तर कुणा चाहत्यानं लिहिलं आहे,'तुझ्या आयुष्यात तुला खूप आनंद मिळो'. अशा अनेक चाहत्यांनी सुश्मिताच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण आता सुश्मिताच्या या पोस्टनं संभ्रम वाढवला आहे.

ललित मोदीनं सुश्मिता सेनसोबतचं नातं सोशल मीडियावर जाहीर केलं तेव्हा आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं,''मी ग्लोबल टूर करून परत लंडनला परतलो आहे. कुटुंबासोबत मालदीव आणि सर्दानियाला गेलो होतो. मी आयुष्याची नवी सुरुवात करत आहे आणि मी खूश आहे. सुश्मिता सेन आणि मला दोघांना शुभेच्छा द्या. आज माझी स्वारी चंद्रावर आहे. मी खूप खूश आहे. प्रेमात पडलोय,याचा अर्थ असा नाही की मी लग्न केलं. अर्थात,देवाचा आशीर्वाद असेल तर ते देखील लवकरच होईल. मी फक्त एवढंच सांगितलं की आम्ही दोघं एकत्र आहोत''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT