Taslima Nasrin News esakal
मनोरंजन

Taslima Nasrin: 'पैशांसाठी तर सुष्मिता हे सगळं करत नाहीस ना?'

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन ही तिच्या रिलेशनशिपवरुन सध्या चर्चेत आली आहे.

युगंधर ताजणे

Sushmita Sen Love Story: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन ही तिच्या रिलेशनशिपवरुन सध्या चर्चेत आली आहे. आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदी (Lalit Modi) यांच्यासोबत विवाहबंधनात सुष्मिता लग्नबंधनात अडकल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर मोदींनी ट्विट करुन आपण अजून लग्न केलं नसून केवळ एकमेकांना डेट करत असल्याचे सांगितले होते. मात्र लवकरच (Bollywood Actress News) लग्न करणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले होते. त्यानंतर बॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली होती. आता प्रसिद्ध लेखिका, विचारवंत तस्लिमा नसरीननं (Social Media Viral news) सुष्मिताचे कान टोचले आहेत.

नसरीननं खोचक ट्विट करुन सुष्मिताला डिवचले आहे. दोन दिवसांपूर्वी यासगळ्या प्रकरणावर सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्यात तिनं कोणतीही डेटिंग नाही, लग्न नाही, अजुन वेटिंगच आहे. अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली होती. सुष्मिताच्या भावानं राजीवनं देखील आपल्याला अजुन याप्रकरणाविषयी कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे नक्की काय मामला आहे, यावरुन चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आल्याचे दिसून आले होते. बांग्लादेशी लेखिका तस्लिमा नसरीन तिच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. ती अनेकदा तिच्या वक्तव्यावरुन चर्चेत आली आहे.

तस्लिमा नसरीननं तर सुष्मिताला हे सगळं पैशांसाठी तर केलं नाहीस ना, असा प्रश्न विचारला आहे. तस्लिमानं बंगाली भाषेत एक पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये ती म्हणते, मी फक्त एकदाच सुष्मिताला भेटले. तिनं माझी तेव्हा गळाभेट घेतली होती. कोलकाता विमानतळावर आमची भेट झाली होती. मला नेहमीच सुष्मिताच्या व्यक्तिमत्वाचे कौतूक वाटत आले आहे. ती एक गुणी अभिनेत्री आहे. तिनं तरुण वयातच दोन मुलींना दत्तक घेतलं. सदयस्थितीवर नेहमीच जागरुक राहत या अभिनेत्रीनं स्वताच्या नावाचा वेगळा ठसा उमटविला आहे.

मात्र आता सुष्मिताचे जे वागणे आहे ते खटकण्यासारखे आहे. ती एका व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे वाचण्यात आले. ती व्यक्ती काही फार आकर्षक नाही. आणि त्याचा संबंध वेगवेगळ्या गुन्ह्यांशी संबंधित आहे. त्यामुळे तिनं हे सगळं पैशांसाठी केलं की काय अशी मला शंका येते, असा प्रश्न नसरीननं यावेळी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT