Sushmita Sen Opens Up On Marriage Plans esakal
मनोरंजन

Sushmita Sen : सुष्मिता लवकरच अडकणार लग्नाच्या बंधनात? रोहमनसोबतच्या नात्यावर काय बोलली

यापुढील काळात आपलं प्लॅनिंग काय असेल यावर तिनं मोकळेपणानं तिचे विचार मांडले आहेत.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Sushmita Sen Opens Up On Marriage Plans: आर्या वेबसीरिजमधून सुष्मितानं जोरदार कमबॅक केलं. तिच्या ताली नावाच्या मालिकेला देखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. या सगळ्यात सुष्मिता ही तिच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेचा विषय राहिली आहे. तिच्या लग्नाच्या प्लॅनिंगविषयी सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

बऱ्याच वर्षांपासून सुष्मिता (Sushmita Sen) ही तिच्यापेक्षा १५ वर्षांनी लहान असणाऱ्या मॉडेल रोहमन शॉलला (Rohman Shwal) डेट करत होती. दरम्यान त्यांच्यात ब्रेक अप झाल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. पुन्हा ते एकत्रही आले. या सगळ्यात सुष्मिता आता त्याच्यासोबत लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यावर तिनं एका मुलाखतीमध्ये त्यावर भाष्य केलं आहे.

यापुढील काळात आपलं प्लॅनिंग काय असेल यावर तिनं मोकळेपणानं तिचे विचार मांडले आहेत. यापूर्वी सुष्मिता तिच्या वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत आल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षी तिचं नाव ललित मोदी यांच्यासोबत जोडलं जात होतं. त्यावर ललित मोदीनं इंस्टावर काही फोटोही शेयर केले होते. त्यामुळे वेगळ्याच चर्चेला उधाण आले होते. सुष्मितानं देखील त्या फोटोंवर तिची प्रतिक्रिया देत आपला त्या पोस्टशी काही संबंध नसल्याचे सांगितले होते.

काय म्हणाली सुष्मिता?

फिल्म कंपेनियनला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सुष्मिता सेननं तिच्या आगामी प्लॅन्सविषयी सांगितले आहे. ती म्हणते, आता सगळं जग मी कोणत्या टप्प्यावर सेट व्हावे याविषयी बोलत आहे. पण मला या सगळ्याची काही पर्वा नाही. असं नाही की मी कोणत्या नात्याचा सन्मान करत नाही. माझा लग्नसंस्थेवर विश्वास आहे. पण मला माझं स्वातंत्र्य जास्त महत्वाचे वाटते.

मला माझ्या आयुष्यात खूप चांगली माणसं भेटली. त्यात आर्याचे दिग्दर्शक राम माधवानी, माझी निर्माती अमिता माधवानी, यांच्या नावाचा समावेश आहे. मला भेटलेल्या प्रभावशाली व्यक्तिंमध्ये मी त्यांची नावं घेईल. माझा मैत्रीवर खूप विश्वास आहे. ती मैत्री चांगली असेल तर तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. असेही सुष्मितानं यावेळी सांगितले.

काही दिवसांपूर्वी सुष्मिता सेनच्या आर्या या मालिकेचा तिसरा सीझनचा टीझर समोर आला होता. ही मालिका ९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यातून सुष्मिताचा एक नवा अंदाज तिच्या चाहत्यांसमोर येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT