sushmita sen, sushmita sen affair, sushmita sen ex boyfriend, sushmita sen video  SAKAL
मनोरंजन

Sushmita Sen Video: एक्स बॉयफ्रेंड सोबत दिसली सुश्मिता सेन, ललित मोदीवरून केलं नेटकऱ्यांनी ट्रोल

सुश्मिता तिच्या मुलीसोबत आणि एक्स बॉयफ्रेंड सोबत इव्हेंट मध्ये दिसली. पण तिला फॅन्सच्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं.

Devendra Jadhav

Sushmita Sen Video with Ex Boyfriend News: सुश्मिता सेन गेल्या काही दिवसांपासून लाइमलाइटमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी तिला आलेल्या हार्ट अटॅकमुळे ती चर्चेत आली होती.

त्यानंतर तिच्या एक्स-बॉयफ्रेंड रोहमन शॉल सोबत तिची पुन्हा वाढणारी जवळीकता देखील चर्चेचा विषय ठरली होती. आता पुन्हा एकदा सुश्मिता सेन चर्चेत आली आहे.

सुश्मिता तिच्या मुलीसोबत आणि एक्स बॉयफ्रेंड सोबत इव्हेंट मध्ये दिसली. पण तिला फॅन्सच्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं.

आर्या फेम अभिनेत्री रविवार 7 मे रोजी मुंबईतील एका अवॉर्ड शोमध्ये निळ्या मखमली पॅंटसूटमध्ये दिसली होती. रेड कार्पेटवर सुष्मिताला तिची मुलगी अलिशा आणि तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल सोबत होता.

सुश्मिता तिच्या आऊटफिटमध्ये एकदम हॉट दिसतेय. सुश्मिता या इव्हेंटमध्ये रोहमन शॉल सोबत आली होती त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

सुष्मिता सेनचे चाहते हा व्हिडिओ पाहून शांत राहू शकले नाहीत. रेड कार्पेटवर नेहमीप्रमाणेच सुंदर दिसल्याबद्दल त्यांच्यापैकी अनेकांनी अभिनेत्रीचे कौतुक केले पण अनेकांनी मात्र तिला ललित मोदींवरून ट्रोल केलंय.

एका फॅनने लिहिले की, "हिला या वयात बॉयफ्रेंड वर बॉयफ्रेंड मिळत आहेत आणि इथे मी ज्याला एकही नाही अजून"

याशिवाय सुष्मिता तिच्या एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत दिसल्याने अनेकांनी उद्योगपती ललित मोदीची चौकशी केली. "ललित मोदी चे काय झाले" असे एका व्यक्तीने लिहिले. अशाप्रकारे सुश्मिताला ट्रोल करण्यात आलंय.

सुश्मिता सेनचं रोहमन शॉल सोबत ब्रेकअप झालं होतं. रोहमन सोबत ब्रेकअप झाल्यानंतर ललित मोदी सोबतच्या तिच्या अफेअरच्या बातम्या जोरदार व्हायरल झाल्या होत्या.

पण त्यानंतर पुन्हा सुश्मिता रोहमन सोबत दिसू लागली. काहीच दिवसांपुर्वी ती रोहमन शॉल आणि आपल्या छोट्या मुलीसोबत शॉपिंग करताना दिसली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Meeting: ओबीसी उपसमिती सर्व कुणबी प्रमाणपत्रांचा अभ्यास करणार; भुजबळांनी मुख्यमंत्र्यांकडे दिले पुरावे

Uddhav Thackeray: आता मी पुन्हा येईन, पुन्हा येईन नाहीतर मी नेहमी येईन... देवेंद्र फडणविसांना टोला लगावत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Velhe Accident : वेल्हे चेलाडी रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतला महिलेचा बळी; रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अडीच महिन्यात गेला दुसरा बळी

Jalgaon News : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या वेतनातून वसूल होणार रक्कम; एमपीडीए कारवाईतील त्रुटी जळगाव प्रशासनाला पडल्या महागात

Samsung Galaxy Z Fold 6 स्मार्टफोनवर चक्क 50 हजारचा डिस्काउंट, किंमत झाली निम्म्यापेक्षा कमी, ऑफर पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT