sushmita sen  Sakal
मनोरंजन

Sushmita Sen: हृदयविकाराच्या झटक्यानंतर सुष्मिता पहिल्यांदाच आली कॅमेरा समोर, जीममध्ये जाण्याविषयी म्हणाली..

आता पहिल्यांदाच सुष्मिता सेनने लाईव्ह येऊन आपली अवस्था दाखवली. तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे तिने आभार मानले.

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री सुष्मिता सेनने नुकतेच तिला हृदयविकाराचा झटका आल्याचा खुलासा केला होता. अचानक अभिनेत्रीबद्दल हे सगळं ऐकून तिच्या चाहत्यांना धक्काच बसला. आता पहिल्यांदाच सुष्मिता सेनने लाईव्ह येऊन आपली अवस्था दाखवली. तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे तिने आभार मानले.

आता ती बारी असल्याचे तिने सांगितले. आजकाल तिला व्हायरल झाले आहे आणि त्यामुळेच तिचा घसा खवखवतोय. तिला थोडं अस्वस्थ वाटत आहे. चला तर मग पाहुयात तब्येतीचे अपडेट देताना तिने कोणत्या गोष्टी सांगितल्या आहेत.

सुष्मिता सेन म्हणाली की, आजकाल अनेकांनी मला माझ्या स्थितीबद्दल विचारले. सर्वांचे खूप आभार. सगळ्यांनी खूप मेसेज आणि कॉल्स केले. माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. त्या सर्वांचे आभार. हे सर्व पाहून मला खूप आनंद झाला.

मिस्टर अँड मिसेस माधवानी, सिया, पंकज असे अनेक नावं या लाईव्हमध्ये तिने घेतली. तसेच कुटुंबीय व डॉक्टरांच्या टीमचे आभार मानले. माझ्या गोपनीयतेची काळजी घेणार्‍या लोकांचेही मी आभार मानते, असे ती म्हणाली.

इंस्टाग्राम लाइव्ह दरम्यान सुष्मिताच्या डोळ्यात पाणी आले. ती टिश्यू पेपरच्या मदतीने डोळे पुसत होती. ती म्हणाली की, जेव्हा तिला नानावटी रुग्णालयात दाखल केले होते, तेव्हा मी तेथे दाखल असल्याचे कोणालाही कळू दिले नाही.

त्यावेळी सर्वांना कळावे असे मला वाटत नव्हते. त्यामुळे तिने डॉक्टरांसह सुरक्षा आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले. सुष्मिता सेन म्हणाली की, मला चाहत्यांकडून खूप प्रेम मिळाले आहे. मी लवकरच बरी होऊन आर्या ३ च्या सेटवर परतेन.

सुष्मिता सेनने जिम आणि वर्कआउटचाही उल्लेख केला. तिला फिटनेसचा फायदा झाल्याचे तिने सांगितले. माझ्या हृदयाच्या ९५ टक्के भागात ब्लॉकेज झालं होतं. तसेच जिम, वर्कआउट आणि हेल्दी लाइफस्टाइलमुळे बरे होण्यास मदत झाली आहे.

ती म्हणाली की, आजकाल अनेक तरुणांना हृदयविकाराचा झटका येत आहे. मला या सर्वांना सांगायचे आहे की, त्यांनी स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर लक्ष ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Semi Final Scenario: भारताला आता फक्त विजय पुरेसे नाही; उपांत्य फेरीसाठीचे गणित पूर्णपणे बदलले

T20 WC, IND vs SA: W,0,W,1,1,W; हार्दिक, रिंकू , अर्शदीप... एकाच षटकात सेम टू सेम OUT! केशव महाराजने ६ चेंडूत फिरवली मॅच

T20 WC, IND vs SA: दक्षिण आफ्रिकेने रोखला भारताचा विजयी रथ! अहमदाबादमध्ये मोठा उलटफेर, सुपर-८ मध्ये चुरस वाढली

Devendra Fadnavis: अजितदादांच्या अपघात झालेल्या विमानातून मीही...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठं वक्तव्य, काय म्हणाले?

Mumbai: मुंबईत प्रवेश करताना दिसणार भव्य स्वागतद्वार! सर्व एंट्री पॉइंट्सवर प्रवेशद्वार बांधणार; रितू तावडेंची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT