sushmita sen taali opens up when people trolled her for playing transgender role gauri sawant SAKAL
मनोरंजन

Sushmita Sen Taali: कमेंटमध्ये 'छक्का' बोलणाऱ्या नेटकऱ्यांना सुष्मिता सेनने दिलं सणसणीत उत्तर, म्हणाली..

सुष्मिता सेन या वेबसिरीजमध्ये गौरी सावंत यांची भुमिका साकारत आहे

Devendra Jadhav

Sushmita Sen Taali News: सुष्मिता सेन सोशल मिडीयावर कमालीची सक्रीय असते. सुष्मिता सेन लवकरच ताली या वेबसिरीजमधुन चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. मराठमोळे दिग्दर्शक रवी जाधव यांची ही वेबसिरीज आहे.

सुष्मिता सेन या वेबसिरीजमध्ये गौरी सावंत यांची भुमिका साकारत आहे. या वेबसिरीजमुळे सुष्मिताला प्रचंज ट्रोलींगला सुद्धा सामोरं जावं लागतंय. पण सोशल मिडीयावर सुष्मिताला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागतंय. त्यामुळे सोशल मिडीयावर वाईट बोलणाऱ्या नेटकऱ्यांना सुष्मिताने चांगलंच सुनावलं आहे.

(sushmita sen taali opens up when people trolled her for playing transgender role gauri sawant)

लोकं वारंवार छक्का म्हणतात

'ताली' या वेबसिरीजमध्ये सुष्मिता सेन ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या श्री गौरी सावंतच्या भूमिकेत दिसणार आहे. सुष्मिताने गेल्या वर्षी इन्स्टाग्रामवर 'ताली'चा फर्स्ट लूक शेअर केला होता.

याबाबत अभिनेत्री म्हणाली, 'ताली चे जे पहिले पोस्टर मी रिलीज केले होते, त्यात माझा अर्धा चेहरा होता आणि टाळ्या वाजल्या होत्या. मला आठवते की कमेंट सेक्शनमध्ये अनेक अनोळखी लोकं होते, जे पुन्हा पुन्हा 'छक्का' लिहीत होते. मी विचार केला, ते माझ्याशी हे कसे करू शकतात? मी ते वैयक्तिकरित्या घेतले कारण ते माझ्या टाइमलाइनवर वारंवार घडत होते.

मी फक्त गौरी सावंतची भुमिका साकारतेय

सुष्मिता सेन पुढे म्हणाली, "कमेंटमध्ये वारंवार वाईट बोलणाऱ्या त्या सर्वांना ब्लॉक केले आहे, परंतु अशी माणसं जेव्हा टिका करतात तेव्हा मला आश्चर्य वाटतं की, मी तर फक्त गौरी सावंतची फक्त भुमिका साकारत आहे. परंतु गौरी तिच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण ह्या लोकांबरोबर जगत असते."

लोकांचं माझ्यावर प्रेम...

सुष्मिता सेन पुढे म्हणाली, "मी माझ्या भुमिकेचे आभार मानते की मला कसेतरी बदलण्याची संधी मिळाली. देवाने मला दिलेली आणि माझ्या आयुष्यावर आशीर्वाद दिलेली एकमेव गोष्ट म्हणजे माझ्यावर मनापासून प्रेम करणारे लोक.

मला वाटले की मी एक माध्यम बनू शकेन ज्याद्वारे लोकांचे माझ्यावर असलेले प्रेम, त्यासाठी तळमळणाऱ्या वेदना समाजापर्यंत पोहोचवता येईल."

ताली ही वेबसिरीज १५ ऑगस्ट पासुन JIO CINEMAS वर पहायला मिळणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

आमिर खान यांना 'सितारे ज़मीन पर' च्या प्रचंड यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान!

कॅन्सरग्रस्त दीपिका कक्करला भेटायला पोहोचली मराठमोळी सोनाली कुलकर्णी; दोघींचा नेमकं नातं काय?

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT