Lalit Modi Esakal
मनोरंजन

Lalit Modiची प्रकृती बिघडली अन् नेटकऱ्यांना सुष्मिताची चिंता लागली! भावाने दिली प्रतिक्रिया..

Vaishali Patil

बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या कामासह तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. काही दिवसांपुर्वी या अभिनेत्रीचं नाव आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांच्याशी जोडले गेले होते. त्यांच्या नात्याच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

दोघांनाही बराच वेळ ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आता दोघेही एकत्र नसले तरी जेव्हा जेव्हा ललित मोदींचा विषय येतो तेव्हा आता त्यांच्यासोबत सुष्मिता सेनचेही नाव त्यात जोडले जातं.

दरम्यान बतमी ललित मोदी यांच्याशी सबंधित आहे. ते खूप आजारी आहेत. ललित मोदींनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करताना सर्वांना आपल्या आजाराची माहिती दिली. त्यांनी पोस्टद्वारे सांगितले की ते कोविड -19 आणि डिप निमोनियाशी झुंज देत आहेत.

त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवले आहे. ललित मोदी यांनी सांगितले की, ते आजारी असताना मेक्सिकोमध्ये होते. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने लंडनला आणण्यात आले.

ललित मोदींनी सांगितलयं की त्यांना यातुन बरं होण्यासाठी खुप वेळ लागेल. त्याची अशी अवस्था पाहून आता काही लोक बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. मात्र काही नेटकरींना ललित बरं ऐवजी सुष्मिता सेनचीच चिंता होत आहे. अनेकांनी ललित बरा होइल काळजी करु नको असं सुष्मिताला कमेंटमध्ये सांगितलं आहे.

तर दुसरीकडे सुष्मिता सेनच्या भावानेही यांनीही तिच्या लवकरात लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना केली आहे.राजीव सेनने कमेंट करत लवकरात लवकर बरा होशील अशी अपेक्षा असं लिहिलयं मात्र, राजीव सेननंतर आता लोक सुष्मिता सेनच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat HC: Zoom मीटिंग नाही कोर्ट आहे! शौचालयातू सुनावणीला हजर राहून फसला, कोर्टाने ठोठावली शिक्षा... पोटासह खिसाही रिकामा

Pune Railway Station: पुणे स्थानकावर ‘ब्लॅक बॉक्स’ सारखी यंत्रणा; व्यवस्थापक, चालक यांच्या संभाषणाचे होणार रेकॉर्डिंग

Satara Fraud:'साताऱ्यातील एकाची ४३ लाखांची फसवणूक'; पाच जणांवर गुन्हा दाखल,वाळू ठेका देण्याचे दाखवले आमिष

Ashadhi Wari:'माउलींच्या पालखीचे लोणंदमध्ये स्वागत'; दर्शनासाठी भाविकांची गर्दी; निरोप देताना अनेकांचे पाणावले डोळे

Fauja Singh : जगप्रसिद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी अपघाती निधन, रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाची धडक

SCROLL FOR NEXT