sussanne khan dating arslan goni
sussanne khan dating arslan goni  
मनोरंजन

सुझान खान करते 'बिग बॉस'फेम अली गोनीच्या भावाला डेट?

शर्वरी जोशी

कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी त्यांच्या अभिनयासोबतच पर्सनल लाइफमुळेही चर्चेत येत असतात. त्यामुळे अनेकदा चाहत्यांमध्ये सेलिब्रिटींच्या ब्रेकअप, पॅचअपविषयी विविध चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतं. यामध्येच सध्या अभिनेता हृतिक रोशनची एक्स पत्नी सुझान खानची चर्चा रंगली आहे. १५ वर्षांचा संसार मोडल्यानंतर हृतिक आणि सुझान विभक्त झाले. मात्र, तरीदेखील ही जोडी कायम चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत असते. मध्यंतरी हृतिक आणि कंगना रणौतच्या अफेअरची चर्चा रंगली होती. त्यानंतर आता सुझान खानच्या अफेअरची चर्चा रंगली आहे. सुझान कलाविश्वातील एका लोकप्रिय व्यक्तीला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. अनेकदा सुझानला या व्यक्तीसोबत स्पॉट करण्यात आलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर या दोघांच्याही अफेअरची जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र, याविषयी सुझानने मौन बाळगलं आहे.

सुझान खान आणि हृतिक रोशन या दोघांनी २०१४ मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि ते कायदेशीररित्या वेगळे झाले. मात्र, विभक्त झाल्यावरदेखील या दोघांमधील मैत्री कायम आहे. अनेकदा ही जोडी त्यांच्या मुलांसोबत एकत्र वेळ घालवताना दिसतात. परंतु, गेल्या काही दिवसांपासून सुझान अभिनेता अली गोनीच्या मोठ्या भावाला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.

'बिग बॉस १४'फेम अभिनेता अली गोनी याच्या मोठ्या भावाला म्हणजेच अर्सलान गोनी याला सुझान डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. अनेकदा या दोघांना एकत्र पाहण्यात आलं आहे. मात्र, याविषयी सुझानने मौन बाळगलं आहे.

दरम्यान, सुझान आणि हृतिक यांनी २०१३ मध्ये लग्नगाठ बांधली होती. मात्र, काही वैयक्तिक कारणामुळे त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार परस्पर संमतीने हे दोघं २०१४ मध्ये कायदेशीररित्या वेगळे झाले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, पाकिस्तानशी थेट कनेक्शनची शक्यता

High Court : ''मुस्लिमांना लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये राहण्याचा अधिकार नाही'', हायकोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Pankaja Munde Audio: "पंकजा मुंडेंच्या ऑडिओ क्लीपची चौकशी करा"; बजरंग सोनावणेंची निवडणूक आयोगाकडं मागणी

T20 World Cup 2024: भारतात वर्ल्ड कप सामने पाहाता येणार फ्री! पण कोणाला आणि कसे घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : गोल्डी ब्रार अन् लॉरेन्स बिस्नोई सिंडिकेटच्या गुन्हेगारी मॉड्यूलच्या विरोधात मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT