sussanne khan 
मनोरंजन

सुजैन खानने अटकेच्या बातमीवर दिलं स्पष्टीकरण, पोस्ट शेअर करत सांगितली सत्य परिस्थिती

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुजैन खानला मंगळवारी मिडियाच्या माध्यमातून एक धक्कादायक बातमी समजली. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मुंबईमध्ये २२ डिसेंबर पासून ते ५ जानेवारी पर्यंत रात्रीच्या संचारबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी ३४ लोकांसोबत हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुजैन खान, गायक गुरु रांधवा आणि क्रिकेटर सुऱेश रैना यांच्यावर केस दाखल केली गेली. मात्र या संपूर्ण प्रकरणावर आता सुजैन खानने सोशळ मिडियावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. तिने ही बातमी चुकीची असल्याचं सांगत नाराजी व्यक्त केली.

सुजैनने इंस्टाग्रामवर पोस्ट करत म्हटलं, माझं सविनय स्पष्टीकरण- मी काल रात्री एका जवळच्या मित्राच्या बर्थ डे डिनरसाठी गेले होते. आमच्यामधील काही लोक जेडब्ल्यु मॅरिएट, सहार मधील ड्रॅगन फ्लाय क्लबमध्ये पोहोचले. २.३० वाजता अधिकारी क्लबमध्ये आले. जेव्हा क्लब मॅनेजमेंट आणि अधिकारी गोष्टी सांभाळत होते तेव्हा तिथे हजर असलेल्या सगळ्या गेस्टना ३ तास वाट पाहायला सांगितलं गेलं. आम्हाला अखेर ६ वाजता जाऊ दिलं. त्यामुळे मिडियाने असे अंदाज बांधायला सुरुवात केली की तिथे अटक करण्यात आली आहे जे पूर्णपणे चूकीचे आणि बेजाबदार आरोप होते. 

सुजैनने पुढे लिहिलं, मला हे समजलं नाही की आम्हाला का थांबवून ठेवलं आणि अधिकारी आणि क्लब यांचं काय प्रकरण होतं. मी या माझ्या प्रतिक्रियेसोबत सगळ्या गोष्टी स्पष्ट करत आहे. मी मुंबई पोलिसांना खूप आदर करते की ते आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न करत असतात. त्यांच्या तत्परतेशिवाय मुंबईकर्स सुरक्षित नाही राहू शकत.    

sussanne khan shares humble clarification on arrest rumors  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जस्टिस यशवंत वर्मा प्रकरणात 'एफआयआर'ची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली; कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Asian Games 2026: १३ वर्षांच्या शाळकरी मुलीनं जिंकलं 'Gold'; भल्याभल्यांना जे नाही जमलं, ते करून दाखवलं

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

SCROLL FOR NEXT