suyash tilak meet mns chief raj thackeray at dadar  SAKAL
मनोरंजन

Suyash Tilak: सुयश टिळकने तडकाफडकी घेतली राज ठाकरेंची भेट, कारण आलं समोर...

सुयश टिळकने नुकतीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली

Devendra Jadhav

Suyash Tilak Meet Raj Thackeray News: सुयश टिळक हा मराठी मनोरंजन विश्वातील हरहुन्नरी कलाकार. सुयश टिळकला आपण आजवर अनेक मालिका आणि सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय.

सुयशने अलीकडेच लोकमान्य आणि जीवाची होतिया काहिली अशा मालिकांमध्ये अभिनय केलाय. सुयश टिळकने नुकतीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. यामागेचे कारण खास आहे.

अनेकांनी तर्कवितर्क लावले आहेत कि सुयश मनसेमध्ये प्रवेश वैगरे करतोय का? तर असं नाही.. गैरसमज करून नका. दादर वर अभिमान गीत आज भेटीला येतंय.

त्यानिमित्ताने सुयशने राज ठाकरेंची भेट घेतलीय. सुयशने राज ठाकरेंच्या कृष्णकुंजवर जाऊन त्यांची भेट घेतलीय.

यावेळी दादर अभिमान गीत निर्माण करणारे सर्व फिल्ममेकर आणि गाण्याची टीम उपस्थित होती.

सुयशने राज ठाकरेंसोबतचा फोटो पोस्ट करून भारावून जाणारा अनुभव शेअर केलाय. सुयश लिहितो.. दादरच्या रहीवाशांची दैनंदीनी साजरी करणाऱ्या आमच्या दादर अभिमान गीताचा सायंकाळी launch होणार आहे.

त्यानिमित्ताने ज्यांच्याविषयी अतिशय अभिमान वाटतो ज्यांच्या व्यक्तिमत्वाने नेहमी भारावून जायला होतं अश्या माननीय राज ठाकरे साहेबांशी भेट झाली.

त्यांनीही आमच्या दादर अभिमान गीताला शुभेच्छा दिल्या. आज सायंकाळी आपण सर्वही ह्या गाण्याच्या सोहळ्याला शिवाजी पार्क येथे ७ः०० वाजता नक्की उपस्थित रहा." अशी पोस्ट सुयश टिळकने केलीय.

सुयशच्या वर्कफ्रंट बद्दल सांगायचं झालं तर.. सुयशने अलीकडेच लोकमान्य आणि जीवाची होतिया काहिली अशा मालिकांमध्ये अभिनय केलाय. सुयश टिळकने नुकतीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली.

याशिवाय सुयशचं रियल लाईफमध्ये आयुशी भावे सोबत लग्न झालंय. सुयश आणि आयुशी यांचे अनेक रोमँटिक फोटो सोशल मीडियावर दिसतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाजीराव पेशवेंच्या सासरकडील मंडळींचा अवमान; मस्तानीच्या वंशजांचा अमित शहांसोबतच्या कार्यक्रमावर बहिष्कार

Stock Market: शेअरने 24 तासांत बनवले करोडपती; आता केलं कंगाल, एवढी मोठी घसरण कशी झाली?

Mira-Bhayandar: गुजराती व्यावसायिकाला मारहाण! मनसेच्या विरोधात आज मीरा भाईंदर बंद, काय आहे प्रकरण?

आषाढी एकादशीला रंगणार ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ रिअॅलिटी शोचा अंतिम सोहळा

ENG vs IND: टीम इंडियाला पुजाराचा वारसदार मिळेना! ७ सामन्यात 'या' ५ खेळाडूंनी लावली तिसऱ्या नंबरवर हजेरी

SCROLL FOR NEXT