suyash tilak 
मनोरंजन

दैव बलवत्तर म्हणून टळला अनर्थ! मोठ्या अपघातातून बचावला अभिनेता सुयश टिळक

स्वाती वेमूल

मराठी टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता सुयश टिळक हा एका मोठ्या अपघातातून बचावला. सुयशच्या गाडीचा मोठा अपघात झाला होता. या अपघातात त्याला किरकोळ दुखापत झाली असून सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्याने चाहत्यांचे आभार मानले आहेत. 

२८ फेब्रुवारी रोजी पहाटे सुयश एका कॅबने प्रवास करत होता. रस्त्यावर अचानक एका मालवाहतूक गाडीची सुयशच्या कॅबला जोरदार धडक लागली. ही धडक इतकी भयंकर होती की ज्या कॅबमध्ये सुयश बसला होता, ती रस्त्याच्या कडेला लोटली गेली. कॅबमध्ये ड्राइव्हर आणि सुयश हे दोघेच होते. इतका मोठा अपघात होऊनही सुयश आणि कॅब ड्रायव्हरचे नशीब बलवत्तर होते, की त्यांना कोणतीच गंभीर दुखापत झाली नाही. मात्र या दुर्घटनेत त्या कॅबचे नुकसान झाले. 

सुयशच्या अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरली. अनेकांनी त्याच्याकडे विचारणा केल्यानंतर सुयशने सोशल मीडियावर सुखरुप असल्याची माहिती दिली. 'तुम्हा सर्वांच्या प्रार्थनेबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. मी सुखरुप आहे आणि मला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. माणुसकी अजूनही जिवंत आहे', अशी पोस्ट सुयशने लिहिली आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी त्याला काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Closed: सलग 5 दिवस बँका बंद? SBIने दिली अपडेट; सॅलरी-पेन्शन खात्यांसाठी सूचना, कोणत्या दिवशी बँका बंद?

IND vs JPN: भारतीय T20I संघ जपानमध्ये पहिल्यांदाच खेळणार! जाणून घ्या संभावित Playing XI अन् कधी व कुठे पाहाणार ऐतिहासिक सामना?

‘महाभारत’चा भीम 'सौरव गुर्जर'वर गंभीर आरोप; महिलेला लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढलं, पोलिसांनी केली अटक

Pune News: पुणेकरांना गुंठेवारीत दिलासा नाही! मुदतवाढ मिळाली, पण शुल्कात कपात नाही; जुन्याच दराने नियमितीकरण

Marathi News Live Updates : येत्या महिनाभरात मुंबई महानगरपालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT