Swades Fame Gayatri Joshi Makes 1st Public Appearance With Husband After Italy Car at Jio World Plaza opening event  Esakal
मनोरंजन

Gayatri Joshi: इटलीतील अपघातानंतर पतीसह गायत्री जोशी पहिल्यांदाच मिडियासमोर! व्हिडिओ होतोय व्हायरल

Vaishali Patil

Gayatri Joshi: शाहरुख खानसोबत 'स्वदेश' चित्रपटात दिसलेली अभिनेत्री गायत्री जोशी ही काही दिवसांपुर्वी खुपच चर्चेत होती. गायत्री जोशी आणि आणि तिचा पती विकास ओबेरॉय यांचा इटलीमध्ये कार अपघात झाला होता. ज्यानंतर हे कपल खुप चर्चेत आले. आता इटलीमध्ये कार अपघातानंतर पहिल्यांदाच गायत्री आणि तिचा पती विकास ओबेरॉय हे सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले आहेत.

दोघे ही मंगळवारी अंबानी कुटुंबाने आयोजित केलेल्या मुंबईतील जिओ वर्ल्ड प्लाझाच्या उद्घाटनावेळी एकत्र दिसले. रात्री मुंबईतील या कार्यक्रमात गायत्री आणि तिच्या पतीने उपस्थीती दिली. अपघातानंतर गायत्री पहिल्यांदाच दिसल्यामुळे सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

यावेळी गायत्री जोशीने स्टायलिश रफल्ड स्लीव्हजसह पिवळा गाऊन परिधान केला होता. मोकळे केस आणि मिनिमलिस्टिक मेकअप लूकमध्ये ती सुंदर दिसत होती. तर तिचा पती विकास निळ्या रंगाच्या शार्प सूटमध्ये होता.

काही दिवसापुर्वी गायत्री आणि तिचा पती विकास ओबेरॉयचा इटलीमध्ये प्रवास करत असताना अपघात झाला होता. गायत्रीची कार इतर वाहनांना आणि कॅम्पर व्हॅनला धडकली होती. या भीषण कार अपघातात दोघेही थोडक्यात बचावले.

इटलीतील सार्डिनिया येथे हा अपघात झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लॅम्बोर्गिनी आणि फरारीने एकाच वेळी कॅम्पर व्हॅनला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्याने हा अपघात झाला होता.

गायत्रीबद्दल बोलायचे झाले तर 2004 मध्ये आलेल्या 'स्वदेश' चित्रपटात ती शाहरुख खानसोबत दिसली होती. मात्र लग्नानंतर ती अभिनय क्षेत्रातून लांब गेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smartphone Survey: स्क्रीन फुटली,फोन बदलला! ५३% भारतीयांनी खरेदी केला नवीन फोन!

iPhone मध्ये लपलेत 'हे' 5 सिक्रेट फीचर्स, 90% भारतीयांना माहितीच नाहीत

Latest Marathi News Live Update : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान प्रकार उघडकीस

Solapur: गौडगाव (बु) येथे विदयार्थ्यांना वॉटर बॉटल, वॉटर प्युरिफायरचे लोकार्पण, १०० वृक्षांचे वृक्षारोपण

Kolhapur Police Raid : मुंबई-पुण्यातून आणल्या जायच्या महिला; व्हॉट्सॲप ग्रुप करून वाशीतील लॉजमध्ये सुरू होता वेश्‍याव्यवसाय, हायप्रोफाईल रॅकेटचा पोलिसांकडून पर्दाफाश

SCROLL FOR NEXT