swanandi tikekar sangeet ceremony video viral with boyfriend ashish kulkarni SAKAL
मनोरंजन

Swanandi Tikekar Wedding: आई - बाबांनी धरला ठेका! स्वानंदी - आशिषच्या संगीत सेरेमनीचा धम्माल व्हिडीओ व्हायरल

स्वानंदी - आशिषच्या संगीत सेरेमनीचा फोटो व्हायरल झालाय

Devendra Jadhav

Swanandi Tikekar Wedding Updates:

स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांच्या लग्नाची सर्वांना उत्सुकता असते. स्वानंदी - आशिषच्या लग्नापुर्वीचे हळद आणि संगीत सोहळ्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

स्वानंदी - आशिषच्या संगीत सेरेमनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओत स्वानंदीचे आई - वडिल म्हणजेच गायिका आरती अंकलीकर - टिकेकर आणि उदय टिकेकर यांनी खास डान्स केल्याचं दिसतंय.

स्वानंदीच्या संगीत सोहळ्यात आई - बाबांनी धरला ठेका

स्वानंदीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर संगीत सेरेमनीचा व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओत स्वानंदीच्या संगीत सोहळ्यासाठी तिचे कुटुंबिय आणि इंडस्ट्रीतले मित्र - मैत्रीण दिसले. (At Swanandi's music festival)

या सोहळ्यासाठी स्वानंदीच्या आई - बाबांनी खास डान्स करताना दिसला. याशिवाय सुव्रत जोशी, सखी जोशी, जुईली जोगळेकर, रोहित राऊत अशा अनेक कलाकारांनी धम्माल केलेली दिसली.

स्वानंदी - आशिषच्या मेहंदीच्या फोटोंची चर्चा

स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांनी काहीच दिवसांपुर्वी साखरपुडा केला. स्वानंदी आणि आशिषच्या लग्नाची आता सर्वांना उत्सुकता होतीच. अशातच स्वानंदी - आशिष कुलकर्णीच्या घरी लगीनघाई सुरु झालीय.

रविवारी या जोडप्याचा मेंहदी सोहळा पार पडला आहे. स्वानंदी - आशिष कुलकर्णी यांनी नुकतेच तिच्या सोशल मीडियावर मेहंदीचे फोटो शेअर केलेत. 'ही #ANANDI मेहंदी' असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे.

स्वानंदी - आशिष या दोघांच्या नावाचा आनंदी हा हॅशटॅग तिनं तयार केला आहे. आशिष - स्वानंदीच्या मेंहदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. नेटकरी दोघांचे कौतुक करत आहेत.

कोण आहे स्वानंदीचा बॉयफ्रेंड?

स्वानंदीच्या बॉयफ्रेंडचं नाव आहे आशिष कुलकर्णी. आशीष कुलकर्णी हा संगीतकार आहे. आशिष कुलकर्षी हा गायक - संगीतकार आहे. तो इंडीयन आयडॉल 12 व्या सीझनमध्ये सहभागी होता. आशिष कुलकर्णी स्वत:चे लाईव्ह शोज सुद्धा करतो. (Who is Swanandi's boyfriend?)

आशिष आणि स्वानंदी बऱ्याच दिवसापासून एकमेकांना डेट करत होते. आता दोघेही लग्न करणार असल्याने त्याचे चाहते खुप उत्सुक आहेत. या कपलवर चाहते कमेंट्सच्या माध्यमातून अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Department : गुन्हेगारी कमी कशी व्हायची? मोक्का रद्द करतो, गुन्हेगारांच्या टोळीकडे पोलिसानेच मागितले ६५ लाख; सहाय्यक फौजदार निलंबित

दुर्मीळ घटना! नवजात बाळाच्या पोटात आढळला दुसरा गर्भ; जगभरात फक्त 200 प्रकरणांमध्ये नोंद, काय म्हणाले डॉक्टर?

Latest Marathi News Live Update : चंद्रकांत पाटलांना जाब विचारणार, घायवळ प्रकरणावरून रवींद्र धंगेकर आक्रमक

Solapur News: 'मूर्तिकारांच्या अतिक्रमित २० झोपड्या जमीनदोस्त'; महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक, मंडई विभागाची संयुक्त कारवाई

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

SCROLL FOR NEXT