swapnil joshi and shilpa tulaskar intimate bed scene viral in tu tevha tashi zee marathi serial sakal
मनोरंजन

Video: हातात हात, किस केलं मग पुढे.. स्वप्निल जोशी- शिल्पा तुळसकरचा इंटिमेट बेड सीन व्हायरल

झी मराठीवरील 'तू तेव्हा तशी' मालिकेतील 'तो' सीन झाला व्हायरल..

नीलेश अडसूळ

tu tevha tashi : सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेची प्रचंड चर्चाा आहे. प्रेक्षक ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो क्षण जवळ आलेला आहे. ज्यासाठी या मालिकेची सुरवात झाली तोच क्षण म्हणजे अर्थातच सौरभ आणि अनामिका यांच्या एकत्र येण्याचा क्षण मालिकेत आला आहे. अत्यंत वेगवेगळ्या संकटांना तोंड देत अखेर ते एकत्र आले आहे. विशेष म्हणजे केवळ एकत्र आले नाहीत तर त्यांच्या मिलनाचा प्रसंगही मालिकेत आला आहे. त्यामुळे त्यांचा इंटीमेट बेड सीन तुफान व्हायरल होत आहे.

(swapnil joshi and shilpa tulaskar intimate bed scene viral in tu tevha tashi zee marathi serial)

या मालिकेत अभिनेता स्वप्निल जोशी (swapnil joshi) व अभिनेत्री शिल्पा तुळसकर (shilpa tulaskar) प्रमुख भूमिकेत आहेत. स्वप्नील 'सौरभ'ची तर शिल्पा 'अनामिका'च्या भूमिकेत आहे. सध्या ही मालिका रंजक वळणावर आहे. सौरभ आणि अनामिका यांच्या नात्यातली दरी दूर होऊन ते एकत्र आले आहेत. नुकताच एक प्रोमो व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये दोघांचा बेड सीन दाखवण्यात आला आहे.

अनामिकाच्या नवऱ्याची एंट्री झाल्यानंतर मालिकेच्या कथानकाने वेगळं वळण घेतलं. त्याने अनामिका आणि सौरभ यांना वेगळं करण्यासाठी शरथीचे प्रयत्न केले. पण पुन्हा एकदा सौरभ-अनामिका एकत्र आले आहेत. आता त्यांनी लिव्हइनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. याच निमित्ताने मालिकेत रंजक वळण आलं आहे. सौरभ व अनामिका एकमेकांच्या अधिक जवळ आले आहेत. याच व्हिडीओची सध्या चर्चा आहे.

झी मराठीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सौरभ व अनामिका यांचा इंटिमेट सीन पाहायला मिळत आहे. बेडवरील दोघांचा हा सीन असून अनामिका सौरभला किस करत असताना दिसत आहे. तर दोघांचेही अनेक इंटीमेट सीन या मध्ये दाखले आहेत. त्यांची ही भन्नाट केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. पण काही प्रेक्षकांनी मात्र याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. 'संपूर्ण कुटुंब एकत्र बसून मालिका बघतात आणि तुम्ही हे दाखवता, अशा मालिका बंद झाल्या पाहिजेत' अशा अनेक कमेंट या व्हिडीओवर आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st Test Live: रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल यांची शतकी खेळी! विक्रमांचा पाडला पाऊस, २००७ नंतर घडला मोठा पराक्रम

Crime News: लग्नाच्या पहिल्या रात्री खोलीत लावला छुपा कॅमेरा, पत्नीसोबतच्या खाजगी क्षणाचे व्हिडिओ दुबईतील मित्रांना पाठवले अन्...

KBC 17 मध्ये विचारला रामायणाबद्दल सोपा प्रश्न, स्पर्धक विचारच करत राहिली; तुम्ही लगेच उत्तर देऊ शकाल का?

Latest Marathi News Live Update: सुरत हायड्रोजन रेल्वे साइटवर केंद्रीय मंत्रींची पाहणी

IND vs WI 1st Test Live: ध्रुव जुरेलने शतकानंतर केलेल्या सेलिब्रेशन मागचं कारण काय? स्टोरी ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान Video Viral

SCROLL FOR NEXT