swapnil joshi and shilpa tulaskars tu teva tashi Shooting in pune sakal
मनोरंजन

स्वप्नील, शिल्पाच्या 'तू तेव्हा तशी' चे पुण्यात चित्रीकरण

झी मराठी' वाहिनीवरील 'तू तेव्हा तशी' या आगामी मालिकेची अगदी पहिल्या झलक पासूनच प्रेक्षकांमध्ये चर्चा चालू आहे. या मालिकेतून पहिल्यांदाच प्रेक्षकांना स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर ही जोडी पाहायला मिळणार

- अरुण सुर्वे

पुणे : 'झी मराठी' वाहिनीवरील 'तू तेव्हा तशी' या आगामी मालिकेची अगदी पहिल्या झलक पासूनच प्रेक्षकांमध्ये चर्चा चालू आहे. या मालिकेतून पहिल्यांदाच प्रेक्षकांना स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर ही जोडी पाहायला मिळणार आहे. 'तू तेव्हा तशी' या मालिकेचे सध्या पुण्यात विविध ठिकाणी चित्रीकरण सुरू आहे, यानिमित्ताने अभिनेता स्वप्नील जोशी, अभिनेत्री शिल्पा तुळसकर, अभिज्ञा भावे,  दिग्दर्शक मंदार देवस्थळी, निर्माते संदीप जाधव यांच्यासह अभिनेते सुनील गोडबोले, किरण भालेराव, अभिषेक राहाळकर यांनी दिलखुलास संवाद साधला. ('Tu Teva Tashi' Shooting in Pune)

अभिनेता स्वप्नील जोशी म्हणाला, पहिल्या प्रेमाचं आपल्या आयुष्यात खूप खास स्थान असतं आणि त्या पहिल्या प्रेमाच्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात आयुष्यभर साठलेल्या असतात. अशातही जर ते पहिलं प्रेम व्यक्त करायचं राहून गेलं असेल तर? अशाच अव्यक्त प्रेमाची गोष्ट म्हणजे 'तू तेव्हा तशी'. ही मालिका प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास आहे. शिल्पा तुळसकर म्हणाली, "मेघ दाटले या मालिकेनंतर जवळपास २० वर्षांनंतर 'तू तेव्हा तशी'मधून अनामिकाच्या प्रमुख भूमिकेतून मी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे खूप जास्त उत्सुकता आहे. पुन्हा एकदा प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येताना खूप आनंद होतोय. स्वप्नील सोबत खूप वेळानंतर पुन्हा एकदा काम करतेय त्यामुळे एकत्र काम करताना ऑन-स्क्रीन, ऑफस्क्रीन एक पॉझिटिव्ह एनर्जी कायम असते. या मालिकेचं कथानक खूपच वेगळं आणि सुंदर आहे. प्रेमाला वयाचं बंधन नसतं आणि या मालिकेतून ते सुंदररित्या मांडलं आहे."

अभिज्ञा म्हणाली, "सो ऑफिशिअली मी तुम्हाला पुन्हा भेटायला येते आहे एका अशा भूमिकेत जी मला याआधी करायला मिळाली नाही.. मी आशा करते की प्रेक्षकांकडून मला भरभरून प्रेम आणि पाठिंबा मिळेल, कारण माझी मेहनत १०० पटीने जास्त असणार आहे."अभिज्ञा कुठली व्यक्तिरेखा निभावणार ही माहिती अजून तरी गुलदस्त्यातच आहे; पण तिची भूमिका प्रेक्षकांची मनं नक्कीच जिंकेल यात शंकाच नाही.दिग्दर्शक मंदार देवस्थळी म्हणाले, आम्ही कायमच काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय, चालू असलेल्या प्रेमाच्या अनेक गोष्टी सांगितल्या, राहून गेलेल्या प्रेमाची गोष्ट सुद्धा कदाचित आली असेल पण आम्ही ही गोष्ट नव्या पद्धतीने सांगतोय हे 'तू तेव्हा तशी'चे वेगळेपण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT