swapnil joshi at lalbaugcha raja 2023 netizens comment on video SAKAL
मनोरंजन

Lalbaugcha Raja: तु VIP बाबा पण आम्हाला... स्वप्निलने घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन; मात्र नेटकऱ्यांना वेगळीच खंत

स्वप्नील जोशीने लालबाग राजाचं दर्शन घेताच सामान्य माणसाने मनातली खंत व्यक्त केली

Devendra Jadhav

लालबाग राजाचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकभक्त केवळ महाराष्ट्राच नाही तर महाराष्ट्राबाहेरुही दर्शन घेण्यासाठी येत असतात. लालबाग राजाच्या दर्शनासाठी सामान्य माणसं तासन् तास रांगेत उभे असतात.

अंबानीसारख्या उद्योगपतींपासुन ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत लालबाग राजाच्या दर्शनासाठी वेळात वेळ काढून येतात. अशातच मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशीने लालबाग राजाचं दर्शन घेतलंय.

(swapnil joshi at lalbaugcha raja 2023 netizens comment on video)

स्वप्नील जोशी लालबाग राजा चरणी लीन

स्वप्नील जोशीने सोशल मिडीयावर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओत स्वप्नील जोशी पिवळ्या रंगाचा कुर्ता घालून लालबाग राजाच्या दर्शनाला गेलेला दिसतोय.

स्वप्नीलला यावेळी आमदार प्रवीण दरेकर सुद्धा भेटले. स्वप्नीलचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय. पण या व्हिडीओखाली असलेली नेटकऱ्याची कमेंट लक्ष वेधून घेतेय.

स्वप्नीलने घेतलं लालबाग राजाचं दर्शन, पण नेटकऱ्यांची वेगळीच खंत

स्वप्नील जोशी लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेला. पण नेटकऱ्यांनी मनातली एक वेगळीच खंत बोलून दाखवली.

"स्वप्निल तू तर गेलास कारण काय तू व्हीआयपी आहेस पण आमच्या सारख्या सामान्य जनतेला खूप त्रास सहन करून लालबागच्या राजाचे दर्शन होते तेही धक्काबुक्की खात."

अशी कमेंट केलीय. या कमेंटने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

लालबाग राजाच्या मंडपात फ्री स्टाईल हाणामारी

अलीकडेच लालबाग राजाच्या दर्शनासाठी रांगेत असलेल्या भाविकांना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

व्हिडीओ पाहून अनेकजण संताप व्यक्त करीत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओत दर्शनासाठी रांगेत उभे असलेल्या भाविकांना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण केली असल्याचं दिसून येत आहे. यादरम्यान, मंडपात मोठा गोंधळ देखील निर्माण झाल्याचं दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक १७ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाईल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT