swapnil joshi gets emotional after meeting their kids video viral SAKAL
मनोरंजन

Swapnil Joshi Video: "अन् पप्पा इमोशनल झाले" लेकरांनी केलेल्या स्वागताने स्वप्निल भारावला, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

स्वप्नील जोशींच्या मुलांचा व्हिडीओ व्हायरल झालाय

Devendra Jadhav

youtube.com/watch?v=zfGa6dLcKu0Swapnil Joshi Kida Viral Video: स्वप्नील जोशी हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. स्वप्नील जोशीने आजवर अनेक मालिका, सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. स्वप्नीलचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झालाय.

या व्हिडीओत स्वप्नील शुटींग संपवुन मुंबईत परत आल्यावर त्याच्या मुलांनी त्याचं कसं स्वागत केलंय हे पाहायला मिळतंय.

स्वप्नील जोशींच्या मुलांनी बाबाला मारली कडकडून मिठी

स्वप्नील जोशीने त्याच्या इंन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत स्वप्नील मुंबई एअरपोर्टवर पाऊल ठेवताच त्याची दोन्ही मुलं मायरा आणि राघव धावत आली आणि त्यांनी स्वप्नीलला मिठी मारली. यावेळी छोट्या राघवने स्वप्नीलसाठी खास वेलकम ग्रिटींग कार्ड स्वतःच्या हाताने बनवून आणलं.

स्वप्नील जोशीने हा व्हिडीओ शेअर करुन लिहीलं की, "Been there done that…there is no place like “being loved” !!! मायदेशी परत आल्यावर असं स्वागत व्हायला भाग्य लागतं."

स्वप्नील जोशीचा आगामी सिनेमाचं परदेशात शुटींग

स्वप्नील जोशी परदेशात सध्या आगामी सिनेमाचं शुटींग करत आहे. हा सिनेमा म्हणजे इंद्रधनुष्य. ‘मनातल्या उन्हात’, ‘ड्राय डे’, ‘भारत माझा देश आहे’ असे उत्तम आशयसंपन्न चित्रपट दिग्दर्शित केलेले पांडुरंग जाधव आता ‘इंद्रधनुष्य’ हा नवा चित्रपट लंडनमध्ये चित्रीत करत आहेत.

अभिनेता स्वप्नील जोशीसह सागर कारंडे, अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, दीप्ती देवी, अदिती सारंगधर, सुकन्या मोने, नम्रता गायकवाड, नेहा खान, श्वेता पाटील अशी दमदार स्टारकास्ट असून चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त नुकताच करण्यात आला.

काय आहे इंद्रधनुष्य सिनेमाची कथा

इंद्रधनुष्य चित्रपटाची कथा एक पुरुष आणि सात बायका या कथानकावर आधारित असून अतिशय धमाल आणि मनोरंजक अशी आहे.

लंडनमध्ये घडणाऱ्या या कथानकावरील चित्रपटाचं चित्रीकरण लंडनमध्ये सुरू झालं आहे. या चित्रपटामुळे अभिनेता स्वप्नील जोशी पहिल्यांदाच लंडनमध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणाचा अनुभव घेत आहे.

पांडुरंग जाधव यांनी आतापर्यंत केलेले तीनही चित्रपट उत्तम गोष्ट सांगणारे असल्यानं ‘इंद्रधनुष्य’ या चित्रपटातही त्यांच्या दिग्दर्शनाचे आणि सर्व स्टारकास्टच्या अभिनयाचे सप्तरंग दिसतील याची नक्कीच खात्री आहे.

youtube.com/watch?v=zfGa6dLcKu0

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Men Hockey Asia Cup: भारत पुन्हा आशियाचा बादशाह! आशिया कप फायनलमध्ये कोरियाचा पराभव, चषकावर चौथ्यांदा ताबा मिळवला

Lalbaugcha Raja Visarjan: सर्व अडथळे पार करून ३३ तासांच्या मार्गक्रमणानंतर लालबागच्या राजाचे विसर्जन संपन्न

Mohol News : सोलापूर-पुणे महामार्गावर अज्ञात पुरुषाचा कुजलेला मृतदेह सापडला, मोहोळ पोलिसांचा तपास सुरू

Ganpati Visarjan 2025 : देगलूरनगरीत ढोल, ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप; पुढच्या वर्षी लवकर या... या घोषणेने शहर दुमदुमले...!

उत्सवप्रिय सोलापुरात पहिल्यांदाच डीजेमुक्त मिरवणुका! पोलिस आयुक्तांचे मायक्रो प्लॉनिंग, सोलापूर कृती समितीसह सर्व सोलापूरकरांचा पुढाकार

SCROLL FOR NEXT