swapnil joshi shared post on occasion of shri krishna janmashtami he played role of krishna in 'shri krishna' serial of ramanand sagar  sakal
मनोरंजन

30 वर्षांहून अधिक काळ लोटला तरी.. कृष्ण साकारणाऱ्या स्वप्नील जोशीची पोस्ट

स्वप्नीलने 1993 साली रामानंद सागर यांच्या 'श्री कृष्ण' मालिकेत स्वप्नीलचे साकारली होती कृष्णाची भूमिका..

नीलेश अडसूळ

swapnil joshi : मराठीतील एक दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेता म्हणून ख्याती असलेला अभिनेता स्वप्नील जोशी, सध्या बराच चर्चेत आहे. मध्यंतरी केलेली पायी वारी असो, 'चला हवा येऊ द्या' मध्ये विशेष भूमिका असो किंवा 'तू तेव्हा तशी' या मालिकेतील सौरभ पटवर्धन. स्वप्नील हा कायमच प्रेक्षकांना भावाला आहे. आज पासून ३० वर्षांपूर्वीही एक काळ असा आला होता जेव्हा लॉक स्वप्नील जोशीच्या प्रेमात वेडे झाले होते, त्याचे चाहते झाले होते. यामागे कारण होणे 'श्री कृष्ण'.. होय. तीस वर्षांपूर्वी स्वप्नील जोशीने 'श्री कृष्ण' या मालिकेत कृष्णाची भूमिका साकारली होती. त्याचीच आठवण त्याने कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने सांगितली आहे.. (swapnil joshi shared post on occasion of shri krishna janmashtami he played role of krishna in 'shri krishna' serial of ramanand sagar)

स्वप्नीलने आपल्या चाहत्यांना कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोबत आपल्या सोशल मिडीया अकाऊंट वरुन एक व्हिडिओ देखील शेयर केला आहे. हा व्हिडिओ २० वर्षांपूर्वीचा आहे. यामध्ये स्वप्नील कृष्ण रूपात दिसत आहे. सोबत एक कॅप्शनही दिले आहे. तो म्हणतो, '30 वर्षांहून अधिक काळ उलटून गेला तरी या भूमिकेविषयी मनात असलेला आदर आणि प्रेम तसाच आहे. तुम्ही दिलेल्या आभूतपूर्व प्रेमासाठी खूप धन्यवाद. तुम्हा सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा.. राधे राधे..' असे त्याने म्हंटले आहे.रामानंद सागर यांच्या 'उत्तर रामायण' मालिकेत स्वप्नीलने कुशची भूमिका साकारली होती. या मालिकेद्वारे त्याने टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केले होते. त्याचा निरागस चेहरा आणि दमदार अभिनय बघून रामानंद सागर यांनी त्याला 'श्री कृष्ण' मालिकेत कृष्ण बनवण्याचा निर्णय घेतला आणि 1993 साली आलेल्या 'श्री कृष्ण' या मालिकेत स्वप्नील कृष्ण बनून लोकांसमोर आला. त्याने साकारलेला 'कृष्ण' आजही प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालत आहे.

'श्री कृष्णा' मालिकेमुळे स्वप्नीलचे आयुष्य पूर्णतः बदलून गेले. लोक त्याला कृष्ण म्हणूनच ओळखत होते. पण या मालिकेनंतर त्याने पुढे ब्रेक घेतला आणि अभ्यासाकडे लक्ष दिले. पुढे शिक्षण पूर्ण करून त्याने पुन्हा मनोरंजन विश्वात पाऊल ठेवले. आज या सर्व आठवणी स्वप्नीलच्या एका पोस्टने पुन्हा ताज्या झाल्या. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suresh Dhas: ''माझा मुलगा सुपारीसुद्धा खात नाही'', 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'च्या आरोपावर सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

एक नायक तर दुसरी खलनायिका; टीव्हीचे गाजलेले चेहरे पुन्हा भेटीला येणार; कोण आहेत ते? प्रेक्षकांनी सांगितली नावं

Jalgaon News : खेळता खेळता हरवला जीव! जळगावात १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Electricity Supply: अदानी हटाव..., प्रीपेड मीटरला ग्राहकांचा नकार; महावितरण खाजगीकरणाविरोधात कॉंग्रेसचे आंदोलन

Pune Market Committee : संचालक मंडळ बरखास्त करून ईडी व इन्कम टॅक्स चौकशी करा; राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष विकास लवांडे यांची मागणी

SCROLL FOR NEXT