swapnil joshi esakal
मनोरंजन

Swapnil Joshi: स्वप्नील जोशीनं "नाच गं घुमा" नंतर "बाई गं"ची केली घोषणा; सिनेमा 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

"बाई गं" असं स्वप्नील जोशीच्या या नव्या चित्रपटाच नाव आहे. स्वप्नीलच्या या सिनेमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

priyanka kulkarni

Swapnil Joshi: "नाच गं घुमा" (Naach Ga Ghuma) या सिनेमाच्या दमदार घोषणेनंतर महाराष्ट्राचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) अजून एका नव्या कोऱ्या चित्रपटात दिसणार आहे. "बाई गं" असं या नव्या चित्रपटाच नाव असून येत्या 14 जून 2024 रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

2024 वर्ष स्वप्नीलसाठी खास ठरणार आहे. स्वप्नील अभिनेता म्हणून "बाई गं " या सिनेमामध्ये दिसणार आहे. निर्मिती , अभिनय आणि अजून बऱ्याच विविधांगी रूपातून स्वप्नील येणाऱ्या वर्षात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे.

कधी रिलीज होणार "बाई गं "?

14 जून 2024 रोजी "बाई गं " सिनेमा रिलीज होणार असून स्वप्नीलसोबत या चित्रपटात अजून कोण कोण दिसणार हे बघण उत्कंठावर्धक असणार आहे. 2024 वर्षात स्वप्नील स्त्री सक्षमीकरण असलेल्या चित्रपटाच्या सोबतीने अजून काय वेगळं करणार याची उस्तुकता आता सगळ्यांना आहेच.

सिनेमाबद्दल काय म्हणाला स्वप्नील?

"बाई गं" या चित्रपटाबद्दल बोलताना स्वप्नील म्हणाला, "नाच गं घुमा नंतर लगेच बाई गं सारखा चित्रपट करण माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. लवकरच या चित्रपटात मी काय करतोय हे सगळ्यांना सांगण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. 2024 मध्ये खूप काम करतोय आणि तुमचं न थांबता मनोरंजन करता येतंय या सारखं वेगळं सुख काय असणार ना ! निर्मिती सोबतीने अभिनय करत राहून 2024 वर्षात खूप प्रोजेक्ट्स मधून काम करणार आहे आणि बाई गं नक्कीच काहीतरी खास असणार आहे हे नक्की म्हणून प्रेक्षकांना थोडी वाट बघावी लागणार आहे पण लवकरच या चित्रपटा बद्दल अनेक गोष्टी शेयर करण्यासाठी मे देखील उत्सुक आहे "

चित्रपटाच्या पोस्टर वरून हा चित्रपट नक्कीच आगळावेगळा असणार आहे याची खात्री आहे पण चित्रपटात स्वप्नील सोबत कोण दिसणार हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT