swapnil raste marathi event manager blame pune based politician not give him money life in danger SAKAL
मनोरंजन

Swapnil Raste: "माझ्या जीवाचं बरं वाईट होऊ शकतं", नितीन देसाई घटनेनंतर मराठी व्यावसायिकाची दुःखद कहाणी

पुण्यात राहणाऱ्या एका राजकारण्याने पैसे बुडवल्याचा आरोप इव्हेंट मॅनेजर स्वप्निल रास्तेने केलाय

Devendra Jadhav

Swapnil Raste News: गेल्या काही दिवसांपुर्वीच कलादिग्दर्शक नितीन देसाईंनी आत्महत्या केली आणि सर्वांना धक्का बसला. एडलवाईज कंपनीने कर्ज फेडण्यासाठी मागे तगादा लावला, असा आरोप करत नितीन देसाईंनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं.

नितीन देसाईंच्या घटनेनंतर एका मराठी इव्हेंट मॅनेजरने सोशल मिडीयावर त्याचं गाऱ्हाणं मांडलंय. पुण्यात राहणाऱ्या एका राजकारण्याने पैसे बुडवल्याचा आरोप इव्हेंट मॅनेजर स्वप्निल रास्तेने केलाय.

(swapnil raste marathi event manager blame pune based politician not give him money life in danger)

स्वामींचं नाव घेत माझे पैसे बुडवले

स्वप्निलने फेसबुकवर पोस्ट करत लिहीलंय की, "मी कला, मनोरंजन व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारा एक कलाकार व इव्हेंट मॅनेजमेंट व्यावसायिक आहे. माझ्यावर कुठलंही कर्ज नाही व मी कोणाचंही कुठलंच देणं लागत नाही. इव्हेंट झाल्यावर वा शूट पूर्ण झाल्यावर कलाकार / तंत्रज्ञ व इतर सर्वांचं ठरलेलं पूर्ण मानधन तत्क्षणी माझ्या कंपनीच्या वा स्वतःच्या खात्यातून देऊन टाकणारा मी एक प्रामाणिक व्यवसायिक आहे. पण काम करून घेऊन माझ्या कष्टाचे कोटी नसले तरी लाखो रुपये कात्रज (पुणे) भागातील एका राजकारण्यानी बुडवलेत. स्वतःला स्वामीभक्त म्हणवणाऱ्या ह्या माणसाने देतो देतो करत स्वामींचं नाव घेऊन घेऊन ते बुडवलेत. तो आर्थिक दृष्टया पूर्णपणे सधन आहे किंबहुना गडगंज श्रीमंत आहे असं म्हणायला ही हरकत नाही. पण मी अजूनही त्या बुडवलेल्या पैशासाठी लढतोय कारण कागदोपत्री नोंद न ठेवता त्यावेळी केवळ विश्वासावर काम माझ्याकडून घेतलं गेलं व केलं गेलं होतं. त्याला जवळपास आता ७ वर्ष होत आली आहेत. माझे लाखो रुपये त्याच्याकडून अजून येणं आहे. एकदम सगळे शक्य नसतील तर हळू हळू द्या असं वारंवार सौम्य भाषेत मागून देखील त्यावर कुठलीही सकारात्मक कृती त्याच्याकडून आजवर नाही."

माझ्या जीवाचं काहीही बरं वाईट होऊ शकतं

स्वप्निलने फेसबुकवर पोस्टवर पुढे लिहीतो, "मी अनेकदा त्यांना विनंती केली, माझी कौटुंबिक सदस्य ह्या नात्याने माझ्या पत्नीने देखील केली. तिच्याशीबोलण्याची भाषा देखील अंशी निगरगट्टपणाचीच होती. मी वेळोवेळी त्यांना संपर्क करायचा प्रयत्न देखील केला पण आमच्यात नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या एका संभषणावरून आता मात्र मला व माझ्या कुटुंबातील सदस्यांना त्या माणसाकडून जिवाला धोका संभवतो, घातपाताची शक्यता संभवते, सूड भावनेने हल्ल्याची शक्यता वा अपहरणाची शक्यता सुध्दा संभवते, खोट्याचा आधार घेऊन कुठल्यातरी सापळ्यात अडकवण्याचा प्रयत्न ही हा माणूस सहज करू शकतो, त्यामुळें मी झालेल्या फसवणुकीची यथायोग्यपणे माहिती त्याचा खरा चेहरा जगासमोर येईल अशा काही संभाषणाच्या पुराव्यासह माझ्या जवळच्या काही आप्तेष्टांकडे अपूर्ण का होईना पण आहेत त्या पुराव्यांसह देऊन व लिहून ठेवली आहे. कारण माझ्या जिवाचं काहीही बरं वाईट हा माणूस नक्की करू शकतो."

काळजी नसावी मला फक्त तुमची साथ हवीय

स्वप्निल शेवटी लिहीतो, "माझ्यावर कुठलंही कर्ज वा कोणाचंच कुठलंही देणं नसताना देखील माझ्या कष्टाच्या लाखो रुपयांवर त्या व्यक्तीने डल्ला मारल्याचे विचार मनांत येऊन मी अनेकदा डिप्रेशनच्या दारात जाऊन परत येतोय. पण लढण्याचा प्रयत्न अजूनही सोडवत नाहीय. मी रास्ते घराण्याशी नातं जोडतो त्यामूळे लढत नक्की राहणार. सहजपणे ही तक्रार नोंदवावी की नाही याबद्दल मी साशंक आहे, कारण लिखापडीत न ठेवता मी केवळ आधी केलेल्या कामाच्या अनुभवामुळे विश्वासावर काम घेतलं होतं आणि पूर्ण केलं होतं. परवाच्या नितीन देसाईंच्या घटनेमुळे अचानक विचार मनात येऊन आपल्यांचा थोडा आधार वाटावा व व्यक्त व्हावं व हा ही एक पुरावा ठेवावा ह्या भावनेने केवळ ही पोस्ट स्वतःच्या सर्व accounts वर लिहीत आहे. मी पूर्णपणे भानावर व stable आहे. काळजी नसावी फक्तं साथ असावी कारण मी ही आजवर भरपूर काम केलं आहे, अनेकांना वेळोवेळी काम दिलेलं ही आहे व त्याचा ठरलेला मोबदला ही दिलेला आहे कुठलीही वेळ न दवडता

कायद्याने कदाचित् शिकवता येत नसेल तरी नियतीने अशा फसवणूक करणाऱ्या माणसांना नक्की धडा शिकवावा ही अपेक्षा."

स्वप्निल रास्तेने केलेल्या या पोस्टवर अनेकांनी त्यांना धीर देत काळजी घेण्याचा सल्ला दिलाय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Abdul Rahman : कोण आहे अब्दुल रहमान? ज्यानं भाजप नेत्याची धारदार शस्त्रानं केलीये हत्या, रहमानवर 'इतक्या' लाखांचं होतं बक्षीस!

Pune Rape Case: पुणे अत्याचार प्रकरणात ट्विस्ट! दोघांची आधीपासूनच ओळख, स्वतःच लिहली धमकी... स्प्रेचा वापर नाही, काय समोर आलं?

Sushil Kediya : मराठीत विचारताच चर्चेतून पळ काढला, ३० वर्षांपासून मुंबईत करतोय काय? कोण आहे सुशील केडिया?

शाळेच्या पहिल्याच दिवशी सातवीतल्या मुलाचा सायलंट हार्ट अटॅकने मृत्यू, नेमकं काय घडलं? CCTV फूजेट आलं समोर

SCROLL FOR NEXT