SWARA BHASKAR to rhea chakraborty 
मनोरंजन

अभिनेत्री स्वरा भास्करने रिया चक्रवर्तीची दहशतवादी कसाबसोबत केली तुलना

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यु प्रकरणात रिया चक्रवर्ती, तिचं कुटुंब, आणि तिच्या काही जवळच्या व्यक्ती या संशयित आहेत. सीबीआय आणि ईडी या प्रकरणाचा तपास करत असताना आता ड्रग्समुळे या प्रकरणात नारकोटिक्स ब्युरोची देखील एंट्री झाली आहे. या संपूर्ण प्रकरणात सोशल मिडियावर रिया चक्रवर्ती विरोधात लोक वेगवेगळ्या प्रकारची चर्चा करत आहेत. म्हणूनंच अभिनेत्री स्वरा भास्करने यावर तिचा राग व्यक्त केला आहे.  

सोशल मिडियावर तसंच मिडियामध्ये रिया चक्रवर्तीच्या बाबतीत अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत मात्र अभिनेत्री स्वरा भास्करने जे म्हटलंय ते  वाचून तुम्हाला धक्का बसेल. स्वराने रिया चक्रवर्तीची तुलना थेट 26/11 चा दहशतवादी अजमल कसाबसोबत केली आहे. पण तिला नेमकं काय म्हणायचं आहे ते तिने तिच्या ट्विटमधून मांडलं आहे. स्वराने ट्विट करत लिहिलं आहे, 'मला नाही वाटत की अजमल कसाब पण मिडियावर एवढा Witch hunt चा विषय बनला असेल जेवढी आत्ता रिया चक्रवर्ती मिडिया ट्रायर सहन करत आहे. भारतीय माध्यमांना लाज वाटली पाहिजे. हा विषारी उन्माद सहन करणा-या लोकांची पण लाज वाटते.'

सोशल मिडियावर स्वराचं हे ट्विट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तिच्या या ट्विटवर चाहते त्यांच मत देखील मांडत आहेत. याआधीही स्वरा भास्करने सोशल मिडियावर रिया चक्रवर्तीला पाठिंबा दिला होता. ती रियाच्या विरोधात सोशल मिडियावर पसरत असलेल्या बातम्यांविषयी देखील ट्विट करुन बोलली आहे. स्वरा नेहमीच सोशल मिडियावर तिचं बिंधास्त मत मांडण्यासाठी ओळखली जाते. तिच्या वक्तव्यांमुळे ती अनेकदा ट्रोल देखील झाली आहे. या प्रकरणात देखील ती अनेकदा रिया चक्रवर्तीला पाठिंबा देताना दिसून आली आहे. त्यामुळे तिच्या ट्विटवर मतप्रदर्शन करण्यासाठी चाहत्यांच्या उड्या पडत आहेत.   

swara bhaskar angry on media trial she compared rhea chakraborty with ajmal kasab  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : 'ऑपरेशन सिंदूर' वेळी कॉंग्रेस पाकिस्तानच्या लष्कराच्या पाठिशी; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

१६ वर्षांच्या भावाला आणून द्या आणि सामना खेळवा; पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांचा भारत-पाकिस्तान मॅचला विरोध

Pune Traffic Update : पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शास्त्रीनगर चौकात उपाययोजना; वाहतूक कोंडीवर तोडगा

Video : शुभांशु शुक्लांनी सांगितलं, अंतराळात व्यायाम कसा करतात? तशीच आसने पृथ्वीवर केल्यास शरीराला कोणते फायदे होतात, जाणून घ्या

Latest Marathi News Updates: सोलापुरातील होडगी रोडवर एका दुचाकीच्या शोरूम ला लागली आग

SCROLL FOR NEXT