swara bhaskar baby celebration on she complete 6 days family celebration with joy fahad ahmad SAKAL
मनोरंजन

Swara Bhaskar Baby: स्वराच्या घरी अनोखं सेलिब्रेशन, नातीच्या आगमनाने आजोबा झालेत भलतेच खुश

स्वरा भास्करच्या घरी नुकत्याच जन्मलेल्या लहान मुलीसाठी सेलिब्रेशन करण्यात आलंय

Devendra Jadhav

Swara Bhaskar News: स्वरा भास्कर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. स्वरा भास्कर गेल्या काही वर्षांपासून सातत्याने तिच्या सामाजिक आणि राजकीय वक्तव्यांमुळे चर्चेत आहे.

स्वरा भास्कर काही दिवसांपूर्वी आई झाली. आई झाल्याची गूड न्यूज तिने सर्वांसोबत शेअर केली. स्वरा आणि तिचा नवरा फहाद अहमद यांच्या आनंदाला उधाण आलंय. अशातच स्वराच्या घरी तिच्या लहान बाळासाठी खास सेलिब्रेशन करण्यात आलंय.

(swara bhaskar baby celebration on she complete 6 days)

नातीच्या आगमनाने आजोबा झालेत भलतेच खूश

स्वराने 23 सप्टेंबर रोजी मुलीला जन्म दिला. तिने आपल्या मुलीचे नावही सांगितले होते. आता स्वराची मुलगी सहा दिवसांची झाली आहे.

अशा परिस्थितीत तिने आपल्या मुलीची छठी साजरी केली. या खास क्षणाचे काही फोटो स्वराने सोशल मिडीयावर शेअर केले

स्वराच्या मुलीच्या छठीचे फोटो

इंस्टाग्रामच्या स्टोरी सेक्शनमध्ये, स्वराने तिच्या मुलीच्या छठीचे फोटो शेअर केलेत. पहिल्या फोटोमध्ये स्वरा आणि फहाद आपल्या मुलीला आपल्या मांडीवर घेऊन प्रेमाने पाहत असल्याचे दिसून येते. हा सुंदर फोटो शेअर करताना स्वराने कॅप्शनमध्ये लिहिले आहे- 'राबिया रामा अहमद की छठी'.

दुस-या आणि तिसर्‍या फोटोत स्वराचे दोन्ही कुटुंब राबियाचे लाड करताना दिसत आहेत. तर, शेवटच्या फोटोमध्ये स्वराचे वडील आणि सासरे म्हणजे राबियाचे दोन्ही आजोबा त्यांच्या नातीचे लाड करताना दिसत आहेत.

स्वराच्या मुलीचं नाव खूपच खास

याआधी स्वराने एक पोस्ट शेअर करून तिच्या मुलीचे नाव सांगितले होते. स्वरा आणि तिचा फहाद अहमद यांनी त्यांच्या मुलीचे नाव राबिया ठेवले आहे. एका सुफी संताच्या नावावर आधारीत हे नाव असल्याचे सांगितले जाते.

राबिया बसरी इराकमधील एक सुफी संत होत्या, ज्यांना इराकची पहिली महिला सूफी संत मानलं जातं. त्या एक अतिशय बलवान महिला होत्या. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य गरिबी आणि उपासनेत घालवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT