swara bhaskar, swara bhaskar wedding, swara bhaskar husband SAKAL
मनोरंजन

Swara Bhaskar: स्वरा भास्कर, फहाद अहमदच्या घरी अवतरली परी; लेकीचं खास नावही केलं शेअर

स्वरा भास्करनं एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : अभिनेत्री स्वरा भास्कर आणि तिचा पती फहाद अहमद यांच्या घरी एका परीचं आगमन झालं आहे. अर्थात या जोडप्यानं एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. स्वरानं स्वतः सोशल मीडियावर पोस्टद्वारे आपल्या लेकीचा फोटो शेअर केला आहे. (Swara Bhaskar blessed with baby girl share her photo and name Raabiyaa on social media)

स्वरानं लेकीचं नावंही केलं जाहीर

"माझी एक प्रार्थना ऐकली, एक आशीर्वाद दिला. एक गाणं मी कुजबुजलं अन् एक गूढ सत्य समोर आलं. आमची मुलगी राबिया हिचा जन्म २३ सप्टेंबर २०२३ रोजी झाला. कृतज्ञ आणि आनंदी अंतःकरणानं तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद! माझ्यासाठी हे संपूर्ण नवीन जग आहे," स्वरानं आपल्या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे.

गौहर खानच्या शुभेच्छा

स्वराच्या पोस्टवर कमेंट्समधून अभिनंदनाचा वर्षाव झाला असून अनेक सेलिब्रेटिंनी आणि सिनेसृष्टीतील कलाकारांनी स्वरा आणि फहाद यांच्याचं भरभरुन अभिनंदन केलं आहे. अभिनेत्री गौहर खान हीनं शुभेच्छा देताना म्हटलं की, "खूप खूप अभिनंदन. सर्वशक्तिमान शक्ती आपल्या बाळाचे रक्षण करो आणि तिला आयुष्यातील सर्व चांगुलपणाचा आशीर्वाद देवो. आमीन"

सेलिब्रेटिंकडून अभिनंदनाचा वर्षाव

लव्हच्या इमोजीसह "बहुत बहुत ज्यादा मुबारक" असं झिशान आयुब यानं म्हटलं आहे. त्याचबरोबर साक्षी जोशीनं म्हटलं, तुम्हा दोघांचं अभिनंदन, तुमचं बाळ सुखरुप असेल अशी आशा करते. अभिनेत्री टिस्का चोप्रानं म्हटलं, अभिनंदन डार्लिंग स्वरा आणि फहाद. नीना गुप्ता यांनी अभिनंदन असं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT