swara bhaskar  Sakal
मनोरंजन

Swara Bhasker Birthday: करिअरमध्ये 9 चित्रपट फ्लॉप, तरीही स्वरा आहे करोडोंची मालकीण...

स्वरा भास्करचा आज वाढदिवस आहे. तिच्या करिअरमध्ये स्वराने आतापर्यंत जवळपास 14 चित्रपटांमध्ये काम केले आहे, त्यापैकी 9 चित्रपट फ्लॉप ठरले आहेत.

Aishwarya Musale

बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्करने भलेही माधोलाल कीप वॉकिंग या चित्रपटातून पदार्पण केले असेल, परंतु हा चित्रपट तिची कारकीर्द चमकवू शकला नाही. यानंतर तिचा 'गुजारिश'ही मोठ्या पडद्यावर चालला नाही.तनु वेड्स मनूसोबत तिचे नशीब चमकले, ज्यामध्ये पायल बनून तिने एवढी कमाल केली की चाहत्यांची मनं थक्क झाली.

लोकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या याच पायलचा म्हणजेच स्वरा भास्करचा आज वाढदिवस आहे. तिच्या करिअरमध्ये स्वराने आतापर्यंत जवळपास 14 चित्रपटांमध्ये काम केले आहे, त्यापैकी 9 चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. असे असूनही स्वरा करोडोंची मालकिन आहे. जाणून घेऊया तिच्या उत्पन्नाचे स्रोत काय आहेत?

9 एप्रिल 1988 रोजी दिल्लीत जन्मलेली स्वरा आर्मी कुटुंबातील आहे. भारतीय नौदलातील एका अधिकाऱ्याची मुलगी आणि दिल्लीच्या JNU मधील प्राध्यापकाची लाडकी मुलगी स्वरा हिची जीवनशैली अतिशय आलिशान आहे. स्वराने तिच्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली होती, पण मोठ्या पडद्यावरही तिने अभिनयाचा पराक्रम दाखवला. अभिनेत्रीच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर ती सुमारे 5 दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे 40 कोटी रुपये आहे.

स्वराचं कमाईचं साधन ​​मुळात अभिनयच आहे. ती एका चित्रपटासाठी 4 ते 5 कोटी रुपये मानधन घेते. याशिवाय, सोशल मीडिया आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून भरपूर कमाई होते, ज्यामुळे ती खूप आलीशान जीवन जगते.

स्वराच्‍या लाईफ स्‍टाईलबद्दल सांगायचे तर अभिनेत्रीचे दिल्ली आणि मुंबईमध्‍ये घरे आहेत, जिची किंमत करोडोंच्‍या घरात आहे. स्वरा अलीकडेच तिच्या मुंबईतील आलिशान थ्री बीएचके फ्लॅटच्या इंटिरियरमुळे प्रसिद्धीझोतात आली. खरंतर या फ्लॅटच्या इंटीरियरवर तिने खूप पैसा खर्च केला होता.

स्वरा भास्करलाही महागाड्या गाड्या ठेवण्याची आवड आहे. तिच्या कार कलेक्शनबद्दल बोलायचे तर तिच्याकडे एकापेक्षा एक उत्तम गाड्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, BMW X1 ही स्वराची आवडती कार आहे. या कारची किंमत सुमारे 48 लाख रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT