स्वरा भास्कर गृहप्रवेश  
मनोरंजन

सात तास, सात वेगवेगळ्या प्रकारची पूजा, स्वराचा 'गृहप्रवेश'

बॉलीवूडमध्ये bollywood असे काही सेलिब्रेटी आहेत जे आपल्या वादग्रस्त स्वभावासाठी ओळखले जातात.

युगंधर ताजणे

बॉलीवूडमध्ये bollywood असे काही सेलिब्रेटी आहेत जे आपल्या वादग्रस्त स्वभावासाठी ओळखले जातात. त्यापैकी काही नावं घ्यायची झाल्यास अभिनेत्री कंगना राणावत kangana ranaut, तापसी पन्नु tapsee pannu, अभिनेता कमाल खान krk ही ती नावं आहेत. या यादीत आणखी एक नाव घ्यावं लागेल. ते म्हणजे अभिनेत्री स्वरा भास्करचं. ती तिच्या अभिनयापेक्षा तिच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वक्तव्यामुळेच जास्त ओळखली जाते. तिनं आणि कंगनानं एकत्र काम केलं आहे. मात्र त्यांच्यातील वैचारिक मतभेद हे अनेकदा समोर आले आहेत. सोशल मीडियावर त्यांच्यातील वाद हा कित्येकदा चाहत्यांसाठी मनोरंजनाचा विषय ठरला आहे. स्वरा swara bhaskar सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. त्याचे कारण तिनं तिच्या नव्या घराचे शेयर केलेले फोटो.

स्वरानं सोशल मीडियावर काहीही शेयर केलं तरी ती सध्या जोरदारपणे ट्रोल होताना दिसते आहे. जवळपास अडीच वर्षानंतर तिला तिच्या नव्या घरात जाण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे तिनं मोठ्या उत्साहानं आपल्या नव्या घराचे फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. याला तिच्या चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. मात्र जे नेहमी स्वराच्या विरोधात असतात त्यांनी तिला या फोटोंवरुन ट्रोलही केलं आहे. नेहमीप्रमाणं स्वरानं त्याकडे दुर्लक्ष केलं आहे. मीडियानं दिलेल्या माहितीनुसार स्वराच्या नव्या घराची पूजा ही सात तास चालली. आणि सात वेगवेगळ्या प्रकारे ही पूजा करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यात गणेश पूजा, सत्यनारायण पूजा, रुद्राभिषेक शेवटी हवन आणि गृहप्रवेश करण्यात आला. यासगळ्या पूजेचे फोटो तिनं शेयर केले आहेत. त्याला तिच्या चाहत्यांनी प्रतिसाद दिला आहे.

अडीच वर्षांनंतर स्वरा आपल्या नव्या घरी गेली आहे. तिनं त्याविषयी लिहिलं आहे की, मी माधझ्या मुंबईतील घराची योग्य पद्धतीनं पूजा केली नव्हती. त्याचं रिनोव्हेशन बराच काळ चाललं होतं. त्यामुळे ते शक्य झालं नाही. आता ते स्वप्न साकापर झालं आहे. याचा मनस्वी आनंद झाला आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये मी या घरात आले होते. आता त्यानंतर मोठ्या काळानं मला त्यात पुन्हा येता आले. ही समाधानाची बाब आहे. कोरोनानं सगळ्यांच्या आयुष्यात मोठे बदल झाले. आपण सर्वांनी खूप काही गमावलं आहे. मात्र या परिस्थितीतही आपण जो सकारात्मक दृष्टीकोन ठेवला आहे त्याचं कौतूक करावं लागेल. अशी प्रतिक्रिया स्वरानं यावेळी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games : स्क्वॅशमध्ये दोन सुवर्णपदकं हुकली! अनाहत-अभय यांना रौप्य, तर बॉक्सिंगमध्ये दोन मेडल्स पक्के

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ऑगस्ट महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरूवात, १५०० की ३०००? असं करा चेक

Ohh No! भारतीय गोलंदाज जखमी, स्ट्रेचरवरून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले; असं नेमके काय घडले?

मनीष मल्होत्रांच्या रॅम्पवर सेलिब्रिटींचा जलवा! सगळीकडे आलियाच्या साडीची चर्चा, लूक पाहून चाहते घायाळ

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT