Swara Bhaskar  Sakal
मनोरंजन

Swara Bhaskar : प्रेम विसरत चाललेल्या देशाला 'व्हॅलेंटाईन डे' च्या शुभेच्छा

आज जगभरात व्हॅलेंटाईन डे उत्साहात साजरा केला जात आहे.

निनाद कुलकर्णी

नवी दिल्ली : आज जगभरात व्हॅलेंटाईन डे उत्साहात साजरा केला जात असून, अनेक जण आपल्या प्रियजनांना आपापल्या पद्धतीने शुभेच्छा देत आहेत. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आजचा दिवस साजरा करत असून, बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करनेही व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, तिने दिलेल्या शुभेच्छांची शैली नेहमीप्रमाणे वेगळी आहे. सामाजिक समस्यांवर अनेकदा उघडपणे मत व्यक्त करणाऱ्या स्वरा भास्करने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रेमाचा संदेश दिला आहे. स्वराचे हे ट्वीट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वाचले जात असून, त्यावर प्रतिक्रियाही येत आहेत.

स्वरा भास्करने तिच्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, 'प्रेम विसरणाऱ्या देशाला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा...' तिने केलेल्या या ट्विटमधील खास संदेशात अनेक गोष्टी दडलेल्या असून, यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

स्वरा भास्करला तनू वेड्स मनू, रांजना, चिल्लर पार्टी, निल बट्टे सन्नाटा आणि वीरे दी वेडिंग यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाते. स्वरा लवकरच तिच्या आगामी चित्रपट 'जहां चार यार' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय स्वराचा शीर कोरमा जगभरातील चित्रपट महोत्सवांमध्ये जोरदार चर्चेत आहेत. चित्रपटांशिवाय स्वरा भास्कर 'रासभरी', 'मांस' आणि 'आपके कमरे में कोई रहता है' या वेब सीरिजमध्ये देकील दिसली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT