swara bhaskar, swara bhaskar wedding, swara bhaskar husband SAKAL
मनोरंजन

लग्नानंतर फ्रिज, सुटकेस, अनैतिक टीका करणाऱ्यांची Swara Bhaskar च्या एका कृतीने झाली बोलती बंद

व्हॅलेंटाईन डेच्या दोन दिवसानंतर १६ फेब्रुवारीला स्वराने फहाद अहमद सोबत लग्न केलं

Devendra Jadhav

Swara Bhaskar News: निल बटे सन्नाटा, रांझणा, तनु वेड्स मनु अशा सिनेमांमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे स्वरा भास्कर. स्वराने गुपचूप कोर्ट मॅरेज करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

व्हॅलेंटाईन डेच्या दोन दिवसानंतर १६ फेब्रुवारीला स्वराने फहाद अहमद सोबत लग्न केलं. स्वराच्या लग्नानंतर तिच्यावर चहूबाजूंनी टीका झाली. पण आता स्वराच्या एका कृतीने सर्वांची बोलती बंद झालीय.

(Swara Bhaskar's responds to haters who talk about his wedding with fahad ahmed)

काही महिन्यांपूर्वी श्रद्धा वालकर हत्याकांड घडलं. श्रद्धाचा पार्टनर आफताबने श्रद्धाचा खुन करून तिचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवल्याची धक्कादायक गोष्ट घडली.

याच गोष्टीचा संदर्भ देऊन स्वराच्या लग्नावर सुद्धा टीका केली जातेय. स्वराचं लग्न झाल्यापासून अनेकांना ते लग्न तितकंसं पटलेलं दिसत नाहीये. स्वराच्या लग्नावर धार्मिक टीका केली जात आहे.

पण नुकतंच स्वराने एक ट्विट करून तिच्या सर्व टीकाकारांची बोलती बंद केलीय. टिकाकार: फ्रिज, सुटकेस, अनैतिक असं काही काही संभाषण करत आहेत.

पण आम्ही: असं ट्विट करून स्वराने तिचा आणि फहादचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलाय. या फोटोत फहाद आणि स्वरा एकदम आनंदात दिसत असून लग्नाच्या वेळी एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत.

अयोध्या येथील महंत राजू दास यांनी स्वरा भास्करच्या लग्नाविरुद्ध एक वादग्रस्त विधान केलं होतं. ते म्हणाले की, जर स्वरा भास्कर हजारो पुरुषांसोबत रात्र घालवणार असेल तर तिला ह्या लग्नाच्या शुभेच्छा.

स्वरा भास्करलाही खूप त्रास सहन करावा लागणार आहे. मी तिला अल्टिमेटम देतो की, तिथे बहिणीसोबत लग्न करतात आणि तीन वेळा तलाख म्हणून अनेक पुरुषांसोबत रात्र घालवावी लागते. जर तिला हजारो पुरुषांसोबत रात्र घालवावी वाटत असेल तर तिला हे लग्न मुबारक असो.

स्वराने हा फोटो पोस्ट करून तिचं नवरा फहाद अहमद वर किती प्रेम आहे हे दर्शवलं आहे याशिवाय तिच्या टीकाकारांची बोलती बंद केलीय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT