swara.jpg 
मनोरंजन

परखड मते मांडणारी ‘स्वरा’ करते आहे, या पत्रकाराला डेट

वृत्तसंस्था

मुंबई ः थेटपणे विषयाला हात घालत विषय तडीस नेणारी तसेच परखड मतं मांडणारी अभिनेत्री म्हणजे स्वरा भास्कर. रांझना’, ‘तनू वेड्स मनू’, ‘नील बट्टे सन्नाटा’, ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटांमध्ये तिने साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांना विशेष लक्षात राहिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी तिच्या ब्रेकअपचं वृत्त होतं. गेल्या पाच वर्षांपासून ती पटकथालेखक हिमांशू वर्माला डेट करत होती. मात्र या दोघांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर आता स्वराच्या आयुष्यात नवीन प्रेम फुलत असल्याचं समजतंय. 

स्वरा भास्कर ही दिवंगत अभिनेते गिरीष कर्नाड यांचा मुलगा रघू कर्नाडला डेट करत असल्याचं वृत्त आहे. रघू पत्रकार आणि लेखक असून, या दोघांना एकत्र सिनेमाला जाताना पाहिलं गेलं आहे. त्यानंतर दोघंही डिनर डेटला एकत्र गेले. त्यामुळे या दोघांमध्ये काहीतरी शिजतंय अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

स्वरा आणि हिमांशू ‘तनू वेड्स मनू’ या चित्रपटासाठी एकत्र काम करत असताना डेट करू लागले होते. यात स्वरा सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत होती. तर हिमांशूने या चित्रपटाची पटकथा लिहिली होती. यानंतर ‘रांझना’ आणि ‘नीलबट्टे सन्नाटा’ या चित्रपटासाठी दोघांनी एकत्र काम केलं. मात्र काही कारणास्तव हे नातं टिकू शकलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Closed: सलग 5 दिवस बँका बंद? SBIने दिली अपडेट; सॅलरी-पेन्शन खात्यांसाठी सूचना, कोणत्या दिवशी बँका बंद?

IND vs JPN: भारतीय T20I संघ जपानमध्ये पहिल्यांदाच खेळणार! जाणून घ्या संभावित Playing XI अन् कधी व कुठे पाहाणार ऐतिहासिक सामना?

‘महाभारत’चा भीम 'सौरव गुर्जर'वर गंभीर आरोप; महिलेला लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढलं, पोलिसांनी केली अटक

Pune News: पुणेकरांना गुंठेवारीत दिलासा नाही! मुदतवाढ मिळाली, पण शुल्कात कपात नाही; जुन्याच दराने नियमितीकरण

Marathi News Live Updates : येत्या महिनाभरात मुंबई महानगरपालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT