Swara Bhasker 
मनोरंजन

Swara Bhasker: धर्म वेगळा अन् वयात अंतर.. तरी फहाद अहमदच्या प्रेमात कशी पडली स्वरा भास्कर? स्वत:च सांगितली लव्ह स्टोरी

Swara Bhasker: स्वरा आणि फहाद यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर स्वरानं तिची प्रेमकहाणी चाहत्यांना सांगितली.

priyanka kulkarni

Swara Bhasker: अभिनेत्री स्वरा भास्करने (Swara Bhasker) 16 फेब्रुवारी 2023 रोजी सामाजिक कार्यकर्ते फहाद अहमदसोबत (Fahad Ahmad) लग्न केले. स्वरा आणि फहाद यांनी कोर्ट मॅरेज केले होते. स्वरा आणि फहाद यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर स्वरानं तिची प्रेमकहाणी सांगितली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन स्वरानं त्याच्या आणि फहादच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितलं.

स्वरानं शेअर केली पोस्ट

स्वरानं तिचे आणि फहादचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, "शहाणे लोक म्हणतात, फक्त मूर्खच लोक घाई करतात...फहाद आणि मी घाईघाईने लग्न केले पण त्याआधी आम्ही तीन वर्षे मित्र होतो. हे असे प्रेम होते जे आम्हा दोघांनाही उमलताना दिसले नाही. कदाचित कारण आमच्यात खूप मतभेद होते. हिंदू-मुस्लिम यात ऑब्वियस होते. मी फहादपेक्षा वयाने मोठी आहे आणि आम्ही दोघे दोन वेगवेगळ्या जगातून आलो आहोत. मी एक मोठ्या शहरातील मुलगी आहे जी मिश्र संस्कृती असलेल्या इंग्रजी भाषिक कुटुंबातून येते आणि तो एक लहान शहरातील मुलगा आहे जो पश्चिम उत्तर प्रदेशातील पारंपारिक उर्दू आणि हिंदुस्थानी भाषिक कुटुंबातून येतो. मी एक हिंदी चित्रपट अभिनेत्री आहे आणि तो एक रिसर्च स्कॉलर, कार्यकर्ता आणि राजकारणी आहे."

CAA-NRC चा विरोध करताना झाली भेट

पुढे स्वरानं पोस्टमध्ये लिहिलं, "पण उदारमतवादी कला शिक्षण आणि मूल्ये, राजकीय दृष्टीकोन आणि आपल्या देशाबद्दल आणि समाजाबद्दलची समान विचारसरणी यांनीआम्हाला एकमेकांना ओळखण्याची संधी दिली. CAA-NRC च्या विरोधादरम्यान डिसेंबर 2019 मध्ये आम्ही भेटलो. आम्ही एकत्र आंदोलनही केले होते. हळूहळू आमची मैत्री झाली. मला फहादसोबत सुरक्षित वाटते आणि नेहमीच आहे. तो म्हणाला की, तो कोणत्याही भीतीशिवाय माझ्याशी काहीही बोलू शकतो."

"अनेक महिन्यांच्या संभाषणानंतर आणि रात्री उशिरापर्यंत झालेल्या चर्चेनंतर मी फहादला पुढे काय करायचे? ते विचारले. तो म्हणाला की आम्ही एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे आहोत, तरीही सुसंगत आहोत. तो मला खूप आवडतो. आपण 2-3 वर्षे एकत्र राहिलो तर आपण लग्न करू शकतो, असा विचार आम्ही केला."असंही स्वरानं पोस्टमध्ये लिहिलं.

स्वरा म्हणाली, "ओळखीचे लोक काय म्हणतील? याची काळजी वाटू लागली होती"

पुढे स्वरानं पोस्टमध्ये लिहिलं, "मला नेहमी वाटायचे की, मी "लोग क्या कहेंगे" या मानसिकतेच्या पलीकडे गेले आहे, पण मला कुटुंब, मित्र, चित्रपट क्षेत्रातील ओळखीचे लोक आणि माझे सदैव निष्ठावंत ट्रोलर्स, कसे प्रतिक्रिया देतील याची काळजी वाटू लागली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, फहाद माझी अव्यक्त भीती वाचू शकला आणि आम्ही त्यावर काम केले."

"आमच्या कुटुंबियांना काळजी होती, पण आम्ही आमच्या प्रेमाच्या पाठीशी उभे होतो. आमच्या पालकांनी आमचा मोठा निर्णय हळूवारपणे चिंता व्यक्त केल्यानंतर स्वीकारला.एका महिन्यानंतर (तोपर्यंत मी गरोदर होते), आम्ही माझ्या नाना-नानींच्या घरी सामायिक रीतिरिवाजांसह उत्सव साजरा केला. तेथे बरेच संगीत, मेजवानी आणि दावत-ए-वलीमा होते. 10 दिवसांचा आनंददायी स्नेहसंमेलन एखाद्या सांस्कृतिक महोत्सवासारखा वाटला!", असंही स्वरानं पोस्टमध्ये लिहिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sant Gajanan Maharaj: पाणी देण्यास नकार दिला... संत गजानन महाराजांनी कोरडी विहीर सजल केली, प्रकट दिनानिमित्त अवश्य दर्शन घ्या…

Pune Schools: पुण्यातील ४७ टक्के खासगी शाळांची पाठ; शिक्षण हक्क कायदा, प्रवेश नोंदणीत शाळांचा हात आखडता

Mahavitaran: महावितरणच्या हलगर्जीपणामुळे कंत्राटी लाईनमनचा मृत्यू; परिसरात संतापाची लाट

Today Horoscope: आज ८ फेब्रुवारीला धोकादायक राहुकाल! सायंकाळी 4:43 नंतर चुकूनही करू नका 'ही' 5 कामे, नाहीतर होईल मोठे नुकसान..

Ladki Bahin Yojana : 'हा आधार क्रमांक e-KYC दुरुस्तीच्या यादीत नाही'; असा मेसेज येणाऱ्या महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाही? याचा नेमका अर्थ काय?

SCROLL FOR NEXT